निंभोरा (दीपनगर): भुसावळ तालुक्यातील दीपनगर जवळील निंभोरा बुद्रुक येथे "जिल्हा स्तरीय महिला धम्म मेळावा" भारतीय बौद्ध महासभा जिल्हा जळगाव पूर्व च्या वतीने घेण्यात येणार असून या महिला मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक प्रा. अंजलीताई आंबेडकर ह्या असणार आहेत.
सदर मेळावा सात दहा दिवशीय उपासका शिबिर व एक दिवसीय समता सैनिक दल शिबिर याचा समारोप हा दि.२६/१२/२५ शुक्रवारी "त्रिरत्न बुद्ध विहार, निंभोरा" येथे करण्यात येणार आहे.
(ads)
या मेळाव्याचे महिला अध्यक्ष प्रियंका अहिरे, स्वागत अध्यक्ष सुमंगल तथा रविंद्र अहिरे तर मेळाव्याचे सूत्रसंचालन महिला जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार व जिल्हा सचिटणीस सुशीलकुमार हिवाळे, हे करणार असून मेळाव्यास प्रमुख उपस्थिती राज्य संघटक लता तायडे, राज्य सचिव प्रचार पर्यटन के. वाय. सुरवाडे, लेफ्ट कर्नल मीना झिने ,व लेफ्ट कर्नल रमेश साळवे तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा जळगाव पूर्व ची पुरुष व महिला कार्यकारणी उपस्थित राहणार आहेत.
(ads)
या मेळाव्याला सर्व तालुका , शहर, गाव , वॉर्ड सर्व कार्यकारणी सह केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, समता सैनिक दल , शिबिरार्थी महिला व जिल्हयातून मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित राहणार आहेत.
(ads)
या महिला मेळाव्यास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
असे आवाहन या मेळाव्याचे आयोजक भारतीय बौद्ध महासभा जिल्हा जळगाव पूर्व च्या वतीने महिला सरचिटणीस वैशाली सरदार व सुशीलकुमार हिवाळे यांनी केले आहे.



