जळगाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे संशोधनात्मक अभ्यास करणारे , सुमारे ८००० पेक्षा अधिक ग्रंथाचे संग्राहक असलेले अरुण सुरवाडे यांनी अलीकडं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित होणाऱ्या ४ ग्रंथांचे मुद्रित शोधन करून दिल्याबद्दल येथील अजिंठा हाउसिंग सोसायटी तर्फे जेतवन बुद्ध विहारात शाल , बुके , ग्रंथ देऊन दिनांक २३ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला .
(ads)
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. आनंद कोचुरे होते .या प्रसंगी अरुण सुरवाडे यांनी आपल्या मनोगतात मुद्रित शोधन करणे किती जिकरीचे व जबाबदारीचे काम असते याबदल माहिती दिली . महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित एका ग्रंथात जळगाव येथील राजमल लखीचंद जैन यांच्या रजमल इंग्रजी नावात एल अक्षर टाईप न केल्याने ते नाव राजमा असे झाले , या ग्रंथाचे पुढं मराठी भाषांतर झाले त्यातही राजमा हेच नाव लिहिले गेले .तेंव्हा मुद्रित शोधन करतांना काना , मात्राच बघून नाही चालत तर मुळ काय असेल हे सुध्दा बघावे लागते असे स्पष्ट केले .
(ads)
प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी सांगितले की शासनातर्फे प्रकाशित ग्रंथ हे प्रमाण मानले जाते , त्याचे संदर्भ इतरत्र दिले जातात मात्र शासनाने सुद्धा अनेकदा चुकीची माहिती छापलेली आहे हे अनेक ग्रंथात दिसून आले आहे . बाबासाहेबांच्या संदर्भाने प्रकाशित ग्रंथांमध्ये तर अधिकच चुकीची माहिती प्रकाशित झालेली आहे , अश्या चुकांची जंत्री अरुण सुरवाडे यांनी तयार केलेली आहे . सर्वच वाचक चिकित्सक पद्धतीने वाचन करत नसल्याने काही प्रसंगी चुकीचे बाबासाहेब वाचून त्या आधारे त्यांनी आपली मते बनवलेली आहेत .
(ads)
या प्रसंगी सुमित्र अहिरे , सोसायटीचे चेअरमन दिलिप सपकाळे , चंद्रशेखर अहिरराव , ॲड. आनंद कोचुरे , पी. डी. सोनवणे यांनी अरुण सुरवाडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे विचार व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षिका ज्योती भालेराव, प्रास्ताविक हर्षल सुरडकर , आभारप्रदर्शन कविता सपकाळे , परिचय दिलिप तासखेडकर यांनी केले.
सुरवातीस भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रीसरण , पंचशील ग्रहण करण्यात आले.
(ads)
या प्रसंगी प्रवीण नन्नवरे , रामकृष्ण सावळे , विलास भालेराव , सुनंदा वाघ , सुमन बौसाने, विमल भालेराव , वर्षा कोचुरे , पूजा कोचुरे , प्रियंका सपकाळे, गणेश सुरवाडे , अर्चना भालेराव , मनीषा भालेराव , गीता सोनवणे , प्रकाश सोनवणे , खुशाल सोनवणे , देवा निकम , सुनील देहाडे, योगेश सोनवणे , आदींसह स्त्री , पुरुष मोठ्या संख्येने हजर होते.



