अन... कुत्रीला फुटला पान्हा : मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे येथील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

उचंदा, दि. 22/12/2025 कुत्रा आणि मांजर म्हटलं कि आठवते त्यांचे पारंपरिक वैर, पण याउलट चित्र बघायला मिळते ते मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे या गावी. शेमळदे येथील रहिवाशी श्री. आकाश रविंद्रनाथ भालेराव (सर ) उपशिक्षक, त्र्यंबकेश्वर माध्यमिक विदयालय रावेर , यांच्या घरी मांजरीचे अतिशय छोटे 2 पिल्लं टॉम & जेरी हे आले

(ads)

ते लहान असल्याने खूप ओरडत होते अशातच भालेराव सर यांच्या घरी असलेल्या 4 वर्ष्याच्या लॅब्राडोर जातीच्या डॉर्मी या श्वानाने त्या मांजराच्या दोन्ही पिलांना जवळ घेऊन मायेची उबा दिली व मांजराचे पिल्लं पण डॉर्मी ला आई समजून तिचे दूध प्यायला लागले, व मायेच्या उब मुळे कुत्रीला दूधरूपी अमृताचा पान्हा फुटला.

(ads)

आता डॉर्मी व टॉम & जेरी ची घट्ट मैत्री झाली आहे व तिघे सोबत खेळतात व झोपतात. परिसरातील लोक या अनोख्या मायलेकीचं कौतुक करतात ब हे अजब दृश्य बघतला येतात व आपल्याला कॅमेऱ्यात कैद करतात . सध्या सोशल मीडियावर या अनोख्या मायलेकी प्रसिद्ध होत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!