ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथे अल्पसंख्याक दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली समान संधी केंद्र विभागाचे समन्वयक प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस.एन. वैष्णव हे होते.
(ads)
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. जे. पी. नेहेते यांनी आपल्या भाषणात अल्पसंख्याक दिनाच्या निमित्ताने भारतातील अल्पसंख्याक धर्म आणि भाषा तसेच त्यांच्या संस्कृती व परंपरा या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार तसेच त्यांच्या संस्कृती व परंपरा जतन व संवर्धन करण्यासाठी आपण त्याबद्दल काय काळजी घ्यावी हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले .
(ads)
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. वैष्णव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असे म्हटले की, आपला भारत लोकशाही प्रधान राष्ट्र असून इथे एकमेकांच्या सहकार्याने आपला विकास झाला आहे. तसेच आपल्या पंरपरा सुध्दा एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. असे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात त्या सर्व भाषांमध्ये विविधता असून त्या सर्व भाषांचा सन्मान केला जातो. सर्व धर्मांचे सण एकत्रित साजरे केले जातात.या कार्यक्रमाचा लाभ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी घेतला.
(ads)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एच. एम. बाविस्कर यांनी केले आहे. तर आभार प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी केले. प्रा डॉ पी. आर. गवळी, प्रा. अक्षय महाजन, प्रा. पी.एन. तायडे, डॉ. संदीप साळूंके, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा. व्ही.एच. पाटील, डॉ. रेखा पाटील, प्रा. ऋतूजा एन. पाटील इत्यादी शिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचारी हर्षल पाटील, श्रेयस पाटील, ऋषिकेश महाजन, रोहित चौधरी, अनिकेत पाटील, नितीन महाजन, सहदेव पाटील, गोपाळ पाटील, सौरभ पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



