यावल (सुरेश पाटील) दि २३ डिसेंबर रोजी येथील बेथलं इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक समारोह दिवस व ख्रिसमस कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
(ads)
या प्रसंगी सिनियर के जी आणि जुनिअर के जी विद्यार्थी यांनी शानदार नृत्य सादर केले तसेच प्रभू येशु बद्दल नाट्य सादर करण्यात आले.प्रभू येशू बदल सजावट करण्यात आली होती मंडप टाकून बेथलं स्कूलला शानदार सजावट करण्यात आली होती.विद्यार्थी यांच्या पालकांनी त्यांचे शाळे बद्दल मनोगत व्यक्त करून बेथलं स्कूल आणि शिक्षक स्टाफ बदल शैक्षणिक कामाबाबत समाधान व्यक्त करून कौतुक व्यक्त केले.
(ads)
मुख्य अतिथी सौं वर्षा आकाश चोपडे नगरसेवक या समारंभ अध्यक्ष स्थानी होत्या.सौं पुजा जयंत चोपडे,शारदा महाजन, योगेश चौधरी व विद्यार्थी पालक उपस्थित होते. मिस एनी मॅथयू, मॅडम जस्टीना मॅथयू ,मॅडम सुजन मॅथयू ,मॅडम रंजना चौधरी,मॅडम दिव्या पंडित,मॅडम निशा राणे, मॅडम नितु सोनावणे आदींनी विशेष परिश्रम घेऊन समारोह पार पडला.



