वरणगाव, ता. भुसावळ(सुवर्ण दिप वृत्तसेवा) : वरणगाव शहरातील मुख्य रस्त्यावर मंगळवारी दुपारी साडेचार वाजता गर्दीत एक २० हजारांचा मोबाईल हरवला होता. हा मोबाईल पोलिसांच्या तत्परतेमुळे संबंधिताला परत मिळाला.
(ads)
पिंपळगाव येथील स्वाती भूषण पाटील यांचा वरणगावातील मुख्य रस्त्यावरील गर्दीत २० हजारा रुपये किमतीचा मोबाईल हरवला होता. त्यांनी त्वरित वरणगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, बाजाराच्या गर्दीमध्ये मोबाईल हरवल्याने स्वाती पाटील आणि त्यांचे पती चिंतेत पडले. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांनी त्वरित समाधान अनुभवले. स.पो.नि. अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनात पो.उ.नि. मंगेश बेंडकोळी, पोलीस अंमलदार संजय ठाकणे आणि पोलीस अंमलदार परशुराम गुमळकर यांनी घटनास्थळी पोहोचून बाजारातील सर्व संभाव्य ठिकाणांचा शोध घेतला आणि मोबाईल शोधून तत्काळ मालकास परत मिळवून दिला.
(ads)
पोलिसांनी त्वरीत मोबाईल मिळवून दिल्याने स्वाती पाटील यांनी समाधान व्यक्त केले. या तत्पर कारवाईमुळे वरणगावकरांनी सोशल मीडियावरूनही पोलिसांच्या कार्याची स्तुती केली. दरम्यान, स.पो.नि. अमितकुमार बागुल म्हणाले की, शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोबाईल किंवा इतर वस्तू हरवल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांची मदत घ्यावी. पोलिस तत्काळ आणि प्रभावी कारवाई करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.



