ऐनपूर : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे एक दिवशीय श्रम संस्कार शिबिराचे आयोजन विटवा या गावी उत्साहात संपन्न झाले.
शिबीर उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष विटवा गावचे प्रथम नागरिक मा मुकेश विश्वनाथ चौधरी यांनी भूषविले. संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
(ads)
पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रम अधिकारी डॉ विनोद रामटेके यांनी केले.या शिबिराचे मुख्य वक्ते प्रा. डॉ. डी. बी. पाटील ,माजी कार्यक्रम अधिकारी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या एक दिवशीय शिबिराचे उद्दिष्टे स्पष्ट केले.अश्या शिबीरातून आपणास खूप शिकायला मिळते. हे शिबिर संस्कारांची शाळा आहे. श्रमाचे मुल्य, देशसेवा,त्याग, सहनशीलता प्रेम भाव इत्यादी गोष्टी शिकायला मिळतात असे त्यांनी सांगितले.प्रा डॉ एस ए पाटील व प्रा डॉ पी आर महाजन यांनी ही शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.अध्यक्षिय भाषणात सरपंच मुकेश चौधरी यांनी ऐनपूर महाविद्यालयाने विटवा गावाची दत्तक गाव म्हणून निवड केली त्याबद्दल आभार मानले.
(ads)
या शिबिराच्या माध्यमातून एकत्रित रित्या गावांसाठी खूप काही चांगल्या गोष्टी करता येतील अशी आशा व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा एस. पी. उमरीवाड यांनी केले. या कार्यक्रमाला सरपंच मुकेश चौधरी, उपसरपंच श्री ईश्वर जीवराम चौधरी, ग्रा. पं.सदस्य श्री साहेबराव विकास वानखेडे, ग्रामस्थ श्री मधुकर लक्ष्मण पाटील, सलीम शेख मैताफ,श्री श्रीराम चौधरी, वैभव चौधरी, कैलास मनुरे तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सौ वैशाली तायडे, उपाध्यक्ष सौ संगीता अडागळे, सदस्य सौ सुनीता मधुकर पाटील, विकास कोचुरे आणि जिल्हा परिषद शाळा विटवा येथील मुख्याध्यापक श्री एकनाथ पाटील, शिक्षक श्री विनायक तायडे, सौ मीरा महाजन , राहुल अवसरमल आणि ऐनपूर महाविद्यालयातील प्रा डॉ एस ए पाटील, प्रा डॉ पी आर महाजन राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
(ads)
शेवटी गावातील समस्या जाणून घेण्याकरिता व जनजागृती साठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आणि जिल्हा परिषद शाळा विटवा येथे रॅलीचे विसर्जन करण्यात आले. शाळेच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.सर्वांचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी मानले व अध्यक्षांच्या परवानगीने शिबिराचा समारोप करण्यात आला.




