राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आसिफ मोहम्मद यांची रावेर नगरपालिकेच्या उपनगरध्यक्ष पदी निवड : भाजपाचा पराभव ठरला शहरात चर्चेचा विषय

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

रावेर नगर पालिकेत (Raver Nagar Palika) आज मोठी राजकीय घडामोड घडली आहे.नाट्यमय घडामोडी नंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एक व कॉग्रेसचे दोन नगरसेवक हे असे एकूण तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आसिफ मोहम्मद यांना पाठिंबा दिल्याने त्यांची उपनगरध्यक्ष पदी निवड झाली आहे.यामुळे रावेर शहरात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून भाजपला शहरात मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

       रावेर नगर पालिकेत (Raver Nagar Palika) उपनगरध्यक्ष व स्विकृत नगर सेवक निवडीसाठी पालिकेच्या सभागृहात आज पिठासन अधिकारी तथा लोकनियुक्त नगरध्यक्षा संगिता भास्कर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी उपनगरध्यक्ष पदासाठी भाजपा कडून राजेंद्र पंढरीनाथ चौधरी तर राष्ट्रवादी (अजित पवार) तर्फे आसिफ मोहम्मद यांनी उपनगरध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.

यावेळी (Raver Nagar Palika) उपनगरध्यक्ष पदासाठी आसिफ मोहम्मद यांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून दारा मोहम्मद जाफर मोहम्मद,आसिफ मोहम्मद, सानिया साउथ,मोहम्मद समी, रुबीना बी शेख,शेख सादिक, गोपाळ बिरपन,सालेहा कौसर,नरेंद्र उर्फ पिंटू वाघ, तसेच कॉग्रेस पक्षाकडून शाहीन खान,अनिता तायडे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गणेश सोपान पाटील यांनी आसिफ मोहम्मद यांच्या कडून मतदान केल्याने रावेर नगर पालिकेत "मोठा उलटफेर झाल्याने"  भाजपची मोठी गोची झाल्याचे दिसून आले.

       भाजपा कडून (Raver Nagar Palika) उपनगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र पंढरीनाथ चौधरी यांच्या बाजूने भाजपा नगराध्यक्षा संगीता महाजन नगर सेवक गणेश पाटील सदस्य राजेंद्र चौधरी,अरुण अस्वार, राजेश शिंदे,अरुण अस्वार,योगिता महाजन,सपना महाजन,अर्चना पाटील,सीमा जमादार, तर अपक्ष उमेदवार नितीन महाजन,प्रमिला पाटील यांनी भाजपाच्या बाजूने मतदान केले यावेळी पीठासन अधिकारी तथा (Raver Nagar Palika) नगरध्यक्ष संगिता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे उपनगरध्यक्ष आसिफ मोहम्मद यांची तर स्विकृत नगर सेवक पद्माकर महाजन, दिलीप हिरामण पाटील आणि स्विकृत नगर सेवक म्हणून पद्माकर महाजन आणि  विनीत अग्रवाल निवड करण्यात आली आहे.

रावेरसह संपूर्ण जिल्ह्यात रावेर नगर पालिकेत भाजपचाच उपनगरध्यक्ष होईल अशी चर्चा सर्वत्र होती. परंतु आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी दुपारी तीन वाजता रावेर नगर पालिकेच्या (Raver Nagar Palika) सभागृहात विशेष सभेचे आयोजन केले होते. भाजपाचे सर्व नगरध्यक्षसह सर्व नगर सेवक सर्वात आधी उपस्थित झालेले होते. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगर सेवक आले. त्यानंतर दोन काँग्रेसचे नगर सेवक शाहीन खान,अनिता तायडे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एक नगर सेवक गणेश सोपान पाटील यांनी ऐनवेळी माजी नगरध्यक्ष दारा मोहम्मद यांच्या बाजूने मतदान केल्याने रावेर नगर पालिकेत वारे फिरले आणि राष्ट्रवादीचे आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद हे उपनगरध्यक्ष झाले.

*राष्ट्रवादी (शरद पवार ) गटाचे नगर सेवकाचे ओढताण मध्ये कपडे फाटकी*

      रावेर नगर पालिकेच्या घडामोडी मध्ये महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी (शप) गटाचे नगर सेवक गणेश सोपान पाटील यांची भाजपा व राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या ओढताण मध्ये अंगावरील कपडे फाटले यावेळी उपस्थित नगर सेवकांनी गणेश पाटील यांना सभागृहात नेले यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला.

         *भाजपाचा पराभव ठरला रावेर शहरात चर्चेचा विषय*

उपनगरध्यक्ष पदासाठी राजेंद्र चौधरी यांचा पराभव रावेर शहरात चर्चेचा विषय झाला आहे. यानिमित्ताने भाजपला एक प्रकारचा धक्का मानला जात आहे. रावेर नगर पालिकेत झालेली घडामोड भविष्यात भाजपासाठी मोठी डोकेदुखी होणार असल्याचा अंदाज रावेर शहरातील नागरिक व राजकीय जाणकार सांगत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!