ऐनपूर: सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत स्वामी विवेकानंद जयंती निमित्त व मा जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने महाविद्यालयात व्याख्यानाचे व अभिवादन रॅली चे आयोजन करण्यात आले.
(ads)
या व्याख्यानाचे वक्ते प्रा प्रदीप तायडे यांनी स्वामी विवेकानंदांचे जीवनावर प्रकाश टाकला तसेच मा जिजाऊ यांच्या जीवन वृत्तांत व्याख्यानातून सांगितला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव यांनी केले. उपस्थितांचे आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर यांनी मानले.व्याख्यांनानंतर रॅलीचे आयोजन करून स्वामी विवेकानंद व मा जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून रॅलीचे समारोप करण्यात आला.
(ads)
या रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना एककाचे स्वयंसेवक, प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. ही रॅली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.



