रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :
सरदार जी. जी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा गुणवंत खेळाडू मानव पाटील याने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ६९ व्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. मानवच्या या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे.
(ads)
राष्ट्रीय स्तरावर पदक मिळविल्याबद्दल रावेर शिक्षण संवर्धक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांनी मानवचे अभिनंदन केले आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर. आर. पाटील सर, उपमुख्याध्यापक एन. जे. पाटील सर, उपप्राचार्य शैलेश राणे सर, पर्यवेक्षक वाय. जी. कट्यारमल सर व एस. आर. महाजन सर यांनी मानवच्या यशाचे कौतुक करत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
(ads)
मानवच्या या यशामागे त्याला लाभलेले मार्गदर्शनही तितकेच महत्त्वाचे ठरले आहे. मुख्य प्रशिक्षक हवालदार योगेश महाजन, क्रीडा शिक्षक जे. के. पाटील सर, तसेच युवराज माळी सर व अजय महाजन सर यांनी मानवचे अभिनंदन करून भविष्यात आणखी मोठे यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मानव पाटीलच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तो इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.




