जनरेटर चोरास निंभोरा पोलिसांनी केले 24 तासाच्या आत जेरबंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

जनरेटर चोरास निंभोरा पोलिसांनी केले 24 तासाच्या आत जेरबंद

 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील वडगाव येथील शेती शिवारातील तीन लाख 50 हजार रुपये किमतीचे किर्लोस्कर कंपनीचे मॉडेल क्रमांक KJ 1 -20 ws 1/ 20 केवी डिझेल जनरेटर दिनांक 9 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 सकाळी दहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटाने पावर ग्रीड कंपनीच्या उभारलेल्या टावर जवळील जनरेटर चोरून लंपास केले असल्याची खबर शुभम मनोज कुमार चौधरी राहणार नाशिक यांनी निंभोरा पोलीस ठाण्याला दिल्याने फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल डी बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि मीरा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, दिपाली पाटील, ममता तडवी, हे का अविनाश पाटील, कॉन्स्टेबल किरण जाधव, परेश सोनवणे,सुभाष शिंदे, भूषण सपकाळे,चालक सपकाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्र फिरवून पावर ग्रिड कंपनी चे वडगाव शिवारात टावर जवळील काम करणारा शिपाई आरोपी आकाश मनोहर पाटील राहणार वडगाव याची अधिक चौकशी करून त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी 24 तासात तपास करून जनरेटर चोर आकाश पाटील हाच असल्याचे निष्पन्न झाल्याने आकाश पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यास अटक केली व त्याने दुसऱ्याला दिलेले जनरेटर हस्तगत केले. सदर घटनेचा पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशनच्या सपोनि मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ढाकणे,दिपाली पाटील,ममता तडवी,हे.का.अविनाश पाटील हे तपास करीत आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!