ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना चे हिवाळी संस्कार शिबिर प्राचार्य डॉ जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली विटवे येथे आयोजित करण्यात आले. या शिबिरात प्रा हेमंत बाविस्कर यांनी मतदान जनजागृती वर व्याख्यान दिले.
(ads)
मतदार व लोकशाही ह्या नाण्याच्या दोन बाजू असून त्या भारताच्या उज्वल भविष्यात खूप महत्त्वाची कामगिरी पार पाडत आहेत. म्हणून प्रत्येकाने आपले नांव मतदार यादीत नोंदवून मतदानाचे पवित्र काम करावे असे सांगितले. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक विद्यार्थी यांनी मतदान जनजागृती वर पथनाट्य सादर करून मतदानाचे महत्व पटवून सांगितले.
(ads)
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ व्ही. एन. रामटेके, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. उमारीवाड, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ रेखा पाटील, प्रा कोमल सुतार, श्री श्रेयस पाटील, श्री अनिकेत पाटील यांनी मेहनत घेतली..



