अजिंठा कला महोत्सवाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न
फर्दापूर :- अजिंठा आर्ट सोसायटी जळगाव आयोजित अजिंठा कला महोत्सवाचे उद्घाटन यु.यु.पाटील यांच्या हस्ते दिनांक ९ जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाले . दिपप्रज्वलन भरत गडरी यांनी केले . अध्यक्षस्थानी सागरमल जैन होते.
प्रमुख पाहुणे म्हणून भैय्यासाहेब श्री.स्नेहदिप गरुड , विलास धनसिंग राजपूत,डाॅ. किरण सुर्यवंशी, ए.ए.पटेल,स्नेहल पाटील, पी.पी.साबळे सहायक पोलिस निरीक्षक फर्दापूर व श्री.आर.एस.चौधरी, मुख्याध्यापक माध्यमिक शाळा शेंदुर्णी हजर होते .
श्री,व्ही.आर.पाटील.मुख्याध्यापक पळासखेडे,श्री.एस.के.पाटील सर मुख्याध्यापक नांद्रा.श्री.एस.टी.चिचोले सर मुख्याध्यापक वाकोद,श्री.फिरोज पठाण, उपसरपंच फर्दापूर,शेख झाकिर माजी सरपंच फर्दापूर , दिलिप तासखेडकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रयत्न केले .
प्रास्ताविक शिवप्रसाद जोशी यांनी केले ,
उद्घाटक श्री.यु.यु.पाटील यांनी अजिंठा कला महोत्सवाचे कौतुक केले., .भरत गडरी यांनी ग्रामीण भागात अजून कलेचा प्रसार झाला पाहिजे असे... चित्रकलेचे छोटे प्रदर्शन झाले पाहिजे...असे सांगितले
अध्यक्षीय भाषणात सागरमल जैन यांनी शाळेत चित्रकला प्रदर्शन आयोजन झाले पाहिजे असे सांगितले. सुत्र संचलन .टी.टी.इंगळे यांनी केले , आभार प्रदर्शन एस.टी.चिचोले यांनी केले.
जळगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी या महोत्सवास भेट देऊन सांगितले की , अजिंठा कला महोत्सव केवळ चित्रकारांनाच प्रभावित करत नाही तर एक ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम करीत आहे .
या महोत्सवात ४० प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे , प्रत्येकाची चित्राकृती आकर्षक आहे. अजिंठा लेणीतील ब्लॅक ब्युटी चित्राची साकारलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे .



