ग्रामपंचायत बक्षीपूर ता.रावेर जि.जळगाव येथील बांधलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष....... गावकरी मंडळींनी गावातून घराघरातून पैसे देऊन केली स्मशानभूमीची साफसफाई.......
वर्षानुवर्षी बांधून असलेली स्मशानभूमी याकडे सरपंच उपसरपंच ग्राम विकास अधिकारी यांनी साधे डोंको नही पाहिले नाही म्हणून संतप्त झालेले सर्व ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक घर दहा रुपये वीस रुपये वर्गणी करून स्मशानभूमीची साफसफाई करून गावात एक आदर्श निर्माण केला आहे यात ज्यांनी पुढाकार घेतला असे गावकरी म्हणजे महेंद्र महाजन, डमरू महाजन ,मुकेश महाजन ,राहुल महाजन ,पप्पू महाजन, ईश्वर महाजन, यांचे पूर्ण गावकऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.



