भूमिपुत्रांचा गौरव : शेतकरी नेते रविकांत तुपकर 18 जानेवारीला रावेरला : कृषिसेवक पुरस्काराने शेतकरी बांधवांचा होणार सन्मान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेरला ८ वा कृषिसेवक पुरस्कार सोहळा 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

साप्ताहिक कृषिसेवकच्या वर्धापन दिनानिमित्त 18 जानेवारीला रावेरला 8 वा राज्यस्तरीय कृषिसेवक पुरस्कार वितरण व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या हस्ते भूमिपुत्रांचा गौरव करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा कै श्रीमती शेनाबाई गोंडू पंडीत मराठा समाज मंगल कार्यालयात सकाळी 10:30 वाजता संपन्न होत आहे. 

(ads)

पुरस्कार सोहळ्याचे आयोजन साप्ताहिक कृषिसेवकतर्फे करण्यात आले असून जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव, महालक्ष्मी बायोजिनिक्स चिनावल, गोदावरी फाउंडेशन जळगाव, माऊली फाउंडेशन व भारती ज्वेलर्स रावेर हे प्रायोजक आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुण पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते संपन्न होईल. पुरस्कार वितरण शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पुरस्कारार्थीच्या कार्याचा आढावा व परिचय असलेल्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन डॉ. उल्हास पाटील माजी खासदार जळगाव व शिरीष चौधरी माजी आमदार रावेर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. 

(ads)

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृष्णात महामुलकर (जनरल मॅनेजर, नेटाफिम इरिगेशन), प्रदीप कोठावदे (एम डी ऍग्री सर्च उद्योग समूह), कुर्बान तडवी( जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव),विनोद तराळ (अध्यक्ष माफदा संघटना पुणे ), के बी पाटील (उपाध्यक्ष जैन इरिगेशन जळगाव), अनिल भोकरे (माजी सहसंचालक कृषी विभाग), सुरेश धनके (प्रदेश सरचिटणीस भाजपा), जे के पाटील (माजी अध्यक्ष मुख्याध्यापक महामंडळ), रंजना पाटील (माजी अध्यक्ष जि प जळगाव), संगीता महाजन (नगराध्यक्ष रावेर), नंदकिशोर महाजन( रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख),प्रल्हाद पाटील (सभापती कृ उ बा समिती), डॉ प्रशांत सरोदे (संचालक महालक्ष्मी बायोजिनिक्स), श्रीराम पाटील (उद्योजक जळगाव), योगीराज पाटील (जिल्हाप्रमुख शिवसेना), राहुल पंडीत (अध्यक्ष मराठा समाज विकास मंडळ), डॉ संदीप पाटील (अध्यक्ष माऊली फाउंडेशन रावेर), 

(ads)

पद्माकर महाजन (माजी नगराध्यक्ष रावेर), भारती गणवानी (संचालिका भारती ज्वेलर्स रावेर), विशाल जयस्वाल (पोलीस निरीक्षक रावेर ), भाऊसाहेब वाळके (तालुका कृषी अधिकारी रावेर ), सोपान पाटील (जिल्हाध्यक्ष ड्रीप असोसिएशन जळगाव), महेश महाजन (प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र पाल), राहुल पाटील (अध्यक्ष रावेर तालुका ऍग्रो डीलर असोसिएशन),युगंधर पवार (उद्योजक फैजपूर), सी एस पाटील (अध्यक्ष जळगाव फार्मर प्रो. कंपनी)यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!