ऐनपूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर समारोप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


शिबीराने जबाबदार नागरीक घडतो-प्राचार्य डॉ जे बी अंजने 

ऐनपूर:सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाचा विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे विटवा या गावी समारोप करण्यात आला या समारोप समारंभाचे अध्यक्ष ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ ऐनपूर संस्थेचे माजी सेक्रेटरी गंभीर शेनू चौधरी हे  होते. 

(ads)

समारोप प्रसंगी ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक  मंडळाचे अध्यक्ष  भागवत भाऊ पाटील, उपाध्यक्ष  रामदास नारायण महाजन,सचिव  संजय पाटील संचालक पी आर चौधरी, कैलास पाटील, महाविद्यालय विकास समिती सदस्य पांडुरंग पाटील, दिलीप पाटील, सिनेट सदस्य प्रा डॉ पद्माकर पाटील, धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर,सरपंच मुकेश चौधरी, मुख्याध्यापक विजय चौधरी, ग्रामसेवक मनोहर चौधरी, उपसरपंच ईश्वर चौधरी, प्राचार्य डॉ जे बी अंजने इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

(ads)

सुरवातीला कोमल धामोडकर व काजल कोळी यांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना गीत सादर केले मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ विनोद रामटेके यांनी सात दिवसांचा अहवाल सादर केला. शोषखड्डा, स्मशानभूमीची स्वच्छता, महिला शौचालय स्वच्छता, गुरांच्या पाणी पिण्यासाठी असलेल्या हौदाची स्वच्छता, मंदिर परिसर, ग्रामीण रुग्णालय परिसर, प्राथमिक शाळा परीसर स्वच्छता, गटारी साफसफाई इत्यादी श्रमाची कामे केल्याचे त्यांनी सांगितले. 

(ads)

वैचारिक प्रबोधन मध्ये विजय चौधरी यांनी पाणी व्यवस्थापन, प्रमोद पाटील -वित्तीय साक्षरता, अनिल आसेकर- पत्रकारिता काल,आज आणि उद्या,दिलशाद शेख- युवा संवाद,प्रा डॉ नीता जाधव- बालविवाह प्रतिबंधक कायदा, डॉ एस एस साळुंके -सोशल मीडिया,प्रा डॉ  जयंत नेहेते- शाश्वत विकासात युवकांचे योगदान,प्रा डॉ चतुर गाढे- आपत्ती व्यवस्थापन,प्रा डॉ जी आर ढेंमरे -स्वच्छ भारत अभियान, प्रा हेमंत बाविस्कर -मतदार जनजागृती, अल्ताफ पटेल- शाश्वत विकासासाठी युवक, पोलिस उपनिरीक्षक हरीदास बोचरे- स्पर्धा परीक्षा या विविध विषयांवर तज्ञ वक्त्यांनी शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर पथनाट्ये सादर केली. ग्राम सर्वे केला. या सात दिवसांच्या शिबिरात गावातील लोकांनी तसेच ग्राम पंचायत विटवा यांनी अनमोल सहकार्य केले असेही त्यांनी सांगितले.  त्यानंतर अनुष्का लवंगे ,अर्पिता चौधरी ,प्रतीक्षा पाटील ,सुहानी पाटील ,काजल कोळी ,पवन कोळी ,श्रेयश पाटील ,वैष्णवी  महाजन ,जान्हवी पाटील या स्वयंसेवकांनी आपली मनोगते व्यक्त केली.  

(ads)

  सहाय्यक  कार्यक्रम अधिकारी  प्रा एस पी उमरीवाड यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. विटवा गावचे प्रथम नागरिक  मुकेश चौधरी सरपंच ग्रामपंचायत विटवा यांनी या शिबिरातील स्वयंसेवकांनी स्वच्छता करून आमच्या गावाचा कायापालट करून दिला असे सांगितले. उपाध्यक्ष रामदास महाजन यांनी शिबीर यशस्वी संपन्न केल्या बद्दल आनंद व्यक्त केला.प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी सांगितले की राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरातून जबाबदार नागरिक घडतात. सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा हा काळ असतो. श्रमाचे महत्त्व समजलेले असते. असे प्रतिपादन त्यांनी केले. या समारोप समारंभाचे सूत्रसंचालन कुमारी दीक्षा पाटील हिने केले. 

(ads)

मान्यवरांचे आभार वैष्णवी पाटील या स्वयंसेविकेने मानले . शिबिर यशस्वीतेसाठी प्रा डॉ विनोद रामटेके,प्रा साईनाथ उमरीवाड,प्रा डॉ रेखा पाटील, प्रा डॉ जे पी नेहेते,प्रा कोमल सुतार, प्रा ज्ञानेश्वर कोळी, अनिकेत पाटील, श्रेयस पाटील, सेवा निवृत्त लिपिक श्रीराम चौधरी, हर्षल पाटील यांनी परिश्रम घेतले.शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने समारोप समारंभाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!