महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सहकासरीणी फातिमा शेख यांची आज १९५ वी जयंती .
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुणे येथील दि फिमेल नॉर्मल स्कूल येथे १८४३ ला गेले असता मिचेल यांनी फातिमा शेख यांचेशी ओळख करून दिली . फुले दाम्पत्याच्या कार्याने प्रभावित होऊन फातिमा सावित्रीबाई यांच्या सोबत राहून त्यांच्या कार्यात सहभाग घेऊ लागल्या . पुढं १९४९ मध्ये महात्मा फुले यांनी उस्मान शेख यांच्या घरी प्रौढ मुलं, मुलिं करिता एक शाळा सुरू केली तेंव्हा महात्मा फुले यांनी फातिमा शेख यांची शिक्षिका म्हणून नियुक्ती केली . फातिमा शेख यांनी शिक्षिका म्हणून शिकविण्याचे काम अतिशय उत्साहाने व जिद्दीने सुरू केले त्यांचा या कार्याने त्या भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
फातिमा शेख यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य उर्दू पाठ्यपुस्तक मध्ये २०१४ ला संक्षिप्त माहिती प्रसिद्ध करण्यात आली . २०२२ मध्ये आंध्रप्रदेश सरकारने एका प्राथमिक शाळेत त्यांच्या प्रतिमेचे अनावरण केले व प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमात त्यांचा धडा लावला . आंध्रप्रदेश सरकारच्या या कार्याने फातिमा शेख यांचे कार्य बहुतांश लोकांपर्यत पोहचण्यास मोठी मदत झाली . २०२२ मध्ये त्यांच्या कार्याची दखल गुगलने सुद्धा घेतली आहे . गुगल मुळे त्या भारतभरात पोहचल्या व त्यांच्या संदर्भाने संशोधन सुरू झाले .
फातिमा शेख यांच्या १९५ व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
जयसिंग वाघ
जळगाव



