संपादकीय विशेष लेख : तथागत बुद्ध व आजचे मानसशास्त्र .

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


तथागत बुद्धांनी पंचशीलाचे पालन करायला सांगितले आहे. तर पंचशील म्हणजे काय? पंचशीला मध्ये पाच तत्व आहे किंवा पाच नियम आहेत.त्यामध्ये 1. अहिंसा (मी कोणत्याही प्राणीमात्राची हिंसा करणार नाही.) 2.मी चोरी करणार नाही. 

3 . मी काम वासने पासून दूर राहीन.

 .4. मी खोटे बोलणार नाही.

 5. मी कोणत्याही प्रकारची नशा करणार नाही.

(ads)

 हे पाच मंत्र तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षा अगोदर जगाला सांगितलेली आहेत. त्याचा उपयोग आज जरी करायचं म्हटलं तरी त्याचे सर्व फायदे आणि फायदेच आहेत. एक छान उदाहरणाने जास्त स्पष्ट होईल.

    एका गावामध्ये एक स्त्री असते. ती वयोवृद्ध असते. तिचे असे म्हणणे असते की तथागत बुद्ध हे काहीही सांगत नाहीत. लोकांना फक्त आणि फक्त गप्पा सांगतात. म्हणजे थोडक्यात तर तिचा विश्वास नसतो. मग एक दिवस तथागत बुद्धाचे प्रवचन हे एका गावामध्ये असते त्या ठिकाणी ती वृद्ध स्त्री सुद्धा प्रवचन ऐकायला येते. मग प्रवचना मध्ये तथागत बुद्ध सांगतात की "आले, या बसले, बसा जाता, जा! मग ती स्त्री घरी जाते आणि झोपते. झोपल्याच्या नंतर ती झोपेमध्ये उसनते बडबड करत राहते.

(ads)

काही वेळानंतर, काही डाकू गावामध्ये शिरतात आणि योगायोग असा की ते तिच्या घरामध्ये चोरी करण्याची योजना आखतात. योजना आखल्याच्या नंतर (महीलेचे) तिचं चालू असते. तथागत बुद्ध आले त्यांनी सांगितलं... आले का? या.... चोरांना वाटते की ती स्त्री जागी आहे. मग ते थोडे दडून बसतात. मग चोरांना असं वाटते की आपण थोडं बसावं. मग म्हणते बसले का ? बसा चोरांना पुन्हा शंका येते की म्हातारी जागीच आहे. आपण बसलो तरी सुद्धा तिला आपण बसलेले दिसत आहे. मग चोर विचार करतात. म्हातारी जागी आहे. आपण काहीदिवसानी करू मग ते म्हणतात. आपण उद्या वगैरे सुरू करू मग ते जायला लागतात. मग म्हातारी म्हणते बरं जाता का? जा... या प्रकारे जर तथागत बुद्धाचे एक प्रवचन ऐकून जर एखाद्या म्हातारीच्या घरची चोरी टाळत असेल.

(ads)

 तर आपण जर या पाच नियमाचे पूर्णपणे पालन केले. तर खरंच आपले आयुष्य किती चांगले होईल .याचा विचार आपण करायला पाहिजे. कोणत्याही प्रकारचे नुकसान या पाच नियमाचे अनुकरण केल्याने होत नाही. तथागत बुद्ध हे जगातील पहिले मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी बऱ्याच जणांचे समुपदेशन सुद्धा केल्याचे दाखले त्यांच्या ग्रंथामध्ये उपलब्ध आहेत. जसे की पटाचारा, राजा बिंबिसार , (अहिंसक )डाकू अंगुलीमाल , असे कितीतरी उदाहरणं सांगता येतील .ज्याद्वारे तथागत बुद्ध हे मानसशास्त्रज्ञ होते हे सिद्ध होते. तथागत बुद्धांनी जे पाच नियम सांगितलेले आहेत. त्याचे आपल्या शरीरासोबत सुद्धा संबंध आहे. आपलं शरीर सुद्धा पाच फुटाचे बनलेला आहे. आपल्या ब्रेनचे पार्ट जर बघितले तर आपला मेंदू सुद्धा पाच घटकानुसार किंवा पाच भागांमध्ये विभागला गेलेला आहे. 1. Cerebrum 2. Cerebellum 3. Brain stem 4. Pitituitury gland 5. Hypothalamus या पाच भागापासून मानवी मेंदू हा तयार झालेला आहे. 

(ads)

या पाचही भागाचे विविध प्रकारचे काम आहेत. 1.Cerebrum आपले जे काही विचार आहेत ते विचार आणि त्या विचाराचं योग्य नियोजन करण्याचं काम हे चे आहे. 2. बाहेरून येणारे विचार योग्य आहेत की, अयोग्य आहेत ते आपल्यासाठी हानिकारक आहेत की घातक आहेत. हे तपासण्याचे काम करते. 3. Brain stem या घटकांमध्ये आपल्या शरीरातील जेवढे काही घटक आहेत. त्या घटकांना नियंत्रित करण्याचे काम योग्य फक्त पुरवठा योग्य ठिकाणी सगळ्या गोष्टी पुरवठा करण्याचे काम हे ब्रेन स्टीम हा करत असतो.4. pituitary gland, मानवी शरीरामध्ये विशिष्ट वयानुसार जे काही बदल होतात. ते बदल घडविण्याचे काम ही pituitary gland करत असते. 5 hypothalamus हे शरीरातील विविध संप्रेरक आणि उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणजेच आपल्या शरीरात कोणत्या घटकात काय कमी आहे.कोणत्या घटकात जास्त घटक आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचे नियोजन हे हायपोथिलीमस करीत असतो.

(ads)

त्यानंतर तथागत बुद्धांनी पृथ्वी जी काही बनलेली आहे .ती किंवा निसर्ग जे काही बनलेला आहे. तो पाच घटकांनुसार बनलेला आहे .ते पाच घटक 1. पानी (जलतत्त्व)आपल्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्त्व आहे .जवळपास या पृथ्वीवर 70 टक्के पाणी आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात सुद्धा 70 टक्के पाणी म्हणजेच रक्त आहे. 2 घटक म्हणजे पृथ्वी जडत्व जडपणा हा जो काही आहे. तो पृथ्वी या घटकाचे प्रतिनिधित्व करीत असतो. नंबर 3 घटक आकाश या घटकामुळे आपले शरीर बनलेले असते. चार नंबरचा घटक हवा हवेमुळे सुद्धा आपले शरीर बनलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे. त्या त्या ठिकाणी हवा आपल्या शरीरात वास्तव्य करीत असते. 

(ads)

5 शेवटचा घटक म्हणजे ऊर्जा किंवा सूर्य या घटकामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा टिकून असते .त्यामुळेच हे पाचच्या पाचही घटक तथागत बुद्धांनी सांगितले की ज्यावेळेस ह्या घटकांमध्ये कमी किंवा जास्त होते. तेव्हा आपल्या शरीरामध्ये बर्याच बिमाऱ्या ह्या वाढत असतात. जर हे घटक कमी झाले तर बिमाऱ्या वाढतात आणि जास्त झाले तरी पण बिमाऱ्या वाढतात .म्हणून हे घटक जर योग्य प्रमाणात नियंत्रित ठेवले तर मात्र आपले शरीर निरोगी राहण्यास खूप मदत होते. प्राचीन काळामध्ये जर आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारचा देव किंवा जे महापुरुष होते. ते आपणाला विशिष्ट मुद्रेमध्येच बसलेले आहेत. असे दिसून येते तर त्या काळात कोणत्याही प्रकारची दवाखाने नव्हते औषधे नव्हते ते लोक जंगलात राहत होते. तरी पण त्यांना साधी सर्दी, ताप, खोकला, या प्रकारचे कोणतेही रोग झाल्याचे दाखले आपणाला कोणत्याही धर्मग्रंथांमध्ये दिसून येत नाहीत. राम ,कृष्ण, पैगंबर कुणीही बघा कोणताही देव हा बिमार पडलेला आहे हे आपणाला दिसून येत नाही .याचा अर्थ असा की यांना या पाच घटका विषयी खूप माहिती होती. म्हणजे एखादा घटक जर आपल्या शरीरातला कमी झाला तर, तो घटक कसा वाढवायचा आणि जर एखादा घटक वाढला तर तो कमी कसा करायचा याची माहिती यांना चांगल्या प्रकारे होती. 

(ads)

म्हणून प्राचीन काळातली लोकं ही जास्तीत जास्त दीर्घायुष्य होते कमी रोगट होती. मानवी मेंदू हा चेतन आणि अचेतन अशा दोन भागात काही मानसशास्त्रज्ञाने विभागलेला आहे. तर चेतन म्हणजे काय बाहेरून ज्या काही गोष्टी येतात ती आपल्यासाठी चांगली आहे की खराब आहे ही गोष्ट बघण्याचं काम हे चेतन मन करीत असते तर अचेतन मन मात्र ज्या काही सूचना येतात त्या सूचनाची अंमलबजावणी हे अचेतन मन करीत असते. जसे एका उदाहरणाद्वारे आपण बघू की एक शेतकरी हा त्याच्या शेतामध्ये काय टाकायचं हे त्यांन ठरवायचं असते. जमिनीला ठरवण्याचा अधिकार नाही. मग त्याने जर सोयाबीन टाकली तर सोयाबीनचे पीक हे भरपूर येईल. पण हेच तर त्या शेतकऱ्याने गांजाचे पीक टाकले तर जमिनीला कोणत्याही प्रकारचे देणे घेणे नाही, की गांजाचे पीक व्यवस्थित यायचे किंवा नाही जमीन ही तिच्या मार्फत सोयाबीनला उडदाला मुगाला किंवा इतर अन्य कोणत्याही प्रकारच्या झाडाला पिकाला सारख्याच प्रकारचा पुरवठा ती खालून करीत असते. आणि पाहिजे तेवढं भरभरून पीक ही शेतकऱ्याला देत असते. याच प्रकारे आपलं जे अचेतन मन आहे याला ज्याप्रमाणे आपण सूचना दिल्या त्याप्रमाणे ते मन चालत असते मग त्या सूचना खऱ्या असो की खोटे असो याच्यावर अचेतन मन हे विचार करत नाही मग आपण जर आपल्या मनाला नेहमी सूचना देत राहलो मला गणित नावाचा विषय जमत नाही. 

(ads)

मी यशस्वी आहे.माझं कुणासोबत पटत नाही. मी नेहमी गरीबच राहतो त्या प्रकारच्या चुकीच्या सूचना जर दिल्या तर जो मानवी मेंदू आहे तो मानवी मेंदू हा भरभरून पीक द्यायला सुरुवात करतो. मग मी यशस्वी होत नाही. तर मग भरपूर प्रमाणात यशस्वी होणार नाही. आणि कधीच होणार नाही म्हणून योग्य रीतीने जर आपण मानवी मेंदू हा ट्रेन केला तर आपण बिमारही पडत नाही आणि आत्मविश्वासाने सुद्धा राहू शकतो.


प्रमोद पडघन ( मानसशास्त्रज्ञ )

छ.संभाजीनगर 

संपर्क 9075977239

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!