रावेर (राहुल डी गाढे) : दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने रावेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की रावेर तालुक्यातून मध्य प्रदेशात जाणाऱ्या बऱ्हाणपूर अकंलेश्वर मार्गाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे तसेच रावेर शहरात ठीक ठिकाणी महिलांकरीता स्वच्छतागृह उभारण्यात यावे व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामाची चौकशी करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी दिलेल्या निवेदनाची १५ दिवसात दखल न घेतल्यास संघटनेच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले.याप्रसंगी निळे निशाण संघटनेचे जेष्ठ सदाशिव निकम यांच्या उपस्थितित तसेच रावेर तालुका नियोजन समितिचे अध्यक्ष महेंद्र कोचुरे व रावेर तालुका अध्यक्ष विठ्ठल गाढे यांच्या नेतृत्वाखाली निवेदण देण्यात आले . त्याप्रसंगी नारायण सवर्णे , संजय तायडे , विजय धनगर , अल्काताई जाधव , मनिषाताई वानखेडे , कविताताई वाघ , महेंद्र धनगर , विशाल तायडे , विक्की जाधव , आकाश निकम , उदय वाघ , दादाराव निकम व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .



