चोपडा नगरपालिका उपनगराध्यक्षपदी सेनेचे पंकज बोरोले बिनविरोध..स्विकृत नगरसेवकपदी हनीफशेठ सत्तार,दिपक पाटील व तिलकचंद शहा यांची निवड
चोपडा (संजीव शिरसाठ) : चोपडा नगर परिषदेचे उपनगराध्यक्षपदी पंकज सुरेश बोरोले यांची निवड तर स्वीकृतसदस्य म्हणून शिवसेनेचे हनीफ सत्तार, दिपक पाटील यांची व भाजपातर्फे तिलकचंद शहा यांची निवड करण्यात आली आहे.
(ads)
चोपडा नगरपरिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आल्यानंतर उपनगराध्यक्षपद व स्विकृत नगरसेवक पदाची निवड प्रक्रिया नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मध्ये नगराध्यक्षा नम्रता पाटील, मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन पार पडली .यात पंकज बोरोले यांचा एकमेव नामनिर्देशन वैध ठरल्याने त्यांची निवड घोषित करण्यात आली. दरम्यान स्वीकृत सदस्य म्हणून शिवसेनेचे हनीफ सत्तार आणि दिपक पाटील तर विरोधी पक्षाकडून भाजपचे ज्येष्ठ नेते तिलकाचंद शहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याचे पीठसन अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
(ads)
निवड झालेल्या सर्व सदस्यांचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्यासह उपमुख्य अधिकारी संजय मिसर ,अधिकारी ,कर्मचारी यांच्याहस्ते रोप देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे नगरसेवक डॉ.रोहन पाटील यांनीही सत्ताधारी नगरसेवकांचे तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आपल्याला पाच वर्षे पूर्ण खेळीमेळीत काढायचे आहे. पण चोपडा नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी ही नगरसेवकांच्या नागरिकांच्या समस्यांसाठी मान ठेवावा. असेही सांगितले व आम्हीही विरोधी पक्षात बसलो आहोत याचे भान ठेवा. आणि शहरात उपनगराध्यक्षासह स्वीकृत नगरसेवकांची विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे.यावेळी
(ads)
छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करित मिरवणूक आझाद चौक मल्हारपुरा,आनंद भवानी येथे समारोप करण्यात आला. यावेळी शिवसेनाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



