रावेर (राहुल डी गाढे)
यावल आणि रावेर तालुक्यातील प्रत्येक नागरिक मोतीबिंदूमुक्त व्हावा, या ध्येयाने प्रेरित होऊन आमदार अमोल जावळे यांनी सुरू केलेल्या आरोग्य मोहिमेला मोठे यश मिळत आहे. या उपक्रमांतर्गत गुरुवारी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३५ ज्येष्ठ नागरिकांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, या रुग्णांना घरून आणण्यापासून ते शस्त्रक्रियेनंतर पुन्हा घरी पोहोचवण्यापर्यंतची सर्व व्यवस्था मोफत करण्यात आली होती.
(ads)
ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना शहरात उपचारासाठी येणे सोयीचे व्हावे, यासाठी आमदार जावळे यांच्याकडून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती. केवळ शस्त्रक्रियाच नव्हे, तर औषधोपचार आणि प्रवासाचा खर्चही पूर्णपणे मोफत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे. या मोहिमेच्या यशात जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे मोठे योगदान राहिले.
(ads)
नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रवीण पाटील, डॉ. दिव्या सोनवणे, डॉ. सोनिया अन्सारी, डॉ. स्वाती असोले, डॉ. मयुरी राठोड, डॉ. प्रियांका पाटील, डॉ. विवेक सोलंकी, डॉ. मयुरेश डोंगरे, अनंत लांडगे, सुनिता वक्ते, भाग्यश्री ढाकणे, सागर कोळी, मयुरी हिवरे, उमेश वेल्हाळ, संदीप पाटील या परिचारिकांनी सहकार्य केले. या मोहिमेसाठी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिवम हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंकज पाटील, विद्या पाटील-राजपूत, भरत चौधरी व नितीन तायडे यांनीही सहकार्य केले. मंत्री गिरीश महाजन वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे आरोग्यदूत पै. शिवाजी रामदास पाटील यांनी या उपक्रमाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
(ads)
गरजूंना मिळाला पुन्हा दृष्टी
यावेळी आमदार अमोल जावळे म्हणाले, “गरीब व दुर्बल कुटुंबातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे नेत्र उपचार मिळत नाहीत. या शस्त्रक्रियांमुळे त्यांना पुन्हा दृष्टी लाभली आहे. ‘मोतीबिंदूमुक्त यावल–रावेर तालुका’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन पुढेही सातत्याने करण्यात येईल.



