ज्ञानवंत व्हा किर्तीवंत व्हा गुणवंत व्हा -नरेन्द्र नारखेडे
ऐनपूर:कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पी.एम. उषा सॉफ्ट कॉम्पोनंट अंतर्गत विद्यार्थी - विद्यार्थिनी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
(ads)
या कार्यशाळेचे उद्घाटक नरेंद्र विष्णू नारखेडे, राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी केले. आपल्या जीवनामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, करिअर करण्यासाठी ज्ञान मिळविणे महत्त्वाचे आहे, व्यवसाय करण्यासाठी ज्ञान संपादन करणे आवश्यक आहे, योग्य - अयोग्य काय जो जाणतो त्याला विवेक म्हणतात, सर्वोच्च आहार हा महत्त्वाचा आहे, शारीरिक आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे.
(ads)
तुमचे व्यक्तिमत्व फुलावे, वक्तृत्व कला विकसित व्हावी, समाजाची सेवा करता यावी, देशाची सेवा करता आली पाहिजे, व्यसनमुक्त होण्यासाठी साधना केली पाहिजे, मनावर कंट्रोल केले पाहिजे, सरदार पटेलांचे, तुकाराम महाराजांचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे, गाडगे महाराजांचे, तुकडोजी महाराजांचे, व सर्व संतांचे चरित्र वाचन केले पाहिजे, लहानातून मोठे होणे हे अंगीकारले पाहिजे, आपल्या देशाची संस्कृती अंगीकारा व आपला व्यक्तिमत्व विकास करा असे त्यांच्या उद्घाटनपर समुपदेनामध्ये सांगितले. ज्ञानवंत, किर्तीवंत, गुणवंत व्हा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
(ads)
या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य जे. बी. अंजने यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त पालन करावे, नियमांचे पालन करावे, गुरुजनांचे ऐकावे आणि आपला व्यक्तिमत्व विकास साधावा असे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितले.
(ads)
या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये विश्वातील कोणत्याही व्यक्तीचा विकास हा तीन अंगाने होत असतो. शारीरिक विकास, भावनिक विकास व बौद्धिक किंवा मानसिक विकास. शारीरिक विकास होण्यासाठी आपण अन्नाचे सेवन करतो तसेच भावनिक विकास होण्यासाठी संस्काराचे उपयोजन होणे गरजेचे आहे आणि बौद्धिक विकास होण्यासाठी शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणे गरजेचे आहे या प्रकारे या कार्यशाळेचा हेतू हाच आहे की, विद्यार्थ्यांचा भावनिक आणि मानसिक विकास व्हावा या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असे त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितले. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित मान्यवरांचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव यांनी मानले.
(ads)
कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे समुपदेशक डॉ. माधुरी कासट, साई क्लिनिक जळगाव यांनी वैयक्तिक स्वच्छता या विषयावर समुपदेशन केले. वैयक्तिक स्वच्छता म्हणजे काय ? या प्रश्नांचे उत्तर कोरोनाच्या काळामधील सॅनिटायझर चा वापर केला जात होता हात कसे स्वच्छ करायचे, त्याच्या पाच स्टेपस सांगितल्या, कॉलेजमध्ये येताना पायामध्ये असलेले बूट जमिनीला आदळा ह्या कंडीशन आहेत, त्यांनी हायजिनचे प्रकार सांगितले आहेत, वैयक्तिक स्वच्छता, आंघोळीची स्वच्छता ज्या ठिकाणी स्किन फोल्ड होत असते त्या ठिकाणी स्वच्छता करावे, अन्यथा फंगल निर्माण होतात, इन्फेक्शन होतो, साबण अंगाला लावायची नाही, स्किन ड्राय करणे आवश्यक आहे, जिथे अस्वच्छता आहे ते स्वच्छ ठेवायचे, साबण एकमेकांचे वापरू नये, दातामध्ये अस्वच्छता असेल तर ते हृदयापर्यंत जाऊ शकते, दात जास्त ब्रशने घासायचे नसते, ब्रश सुद्धा खालीवर करायचा असतो, ज्या मुलांची दाढी वाढलेली असेल त्याची सेविंग करणे गरजेचे आहे, व्यवस्थित स्वच्छ केले नाही तर डँड्रफ होतात, पायाची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे, कारण काही कृमी जमिनीवर असतात ते पायाच्या भेगा मध्ये जाऊ शकतात, स्किन केअर, हेअर केअर ची काळजी घेतली पाहिजे, केसांना शाम्पू लावायचे नाही, रिठा, आवळा याने केस धुवायचे असते, तेल दिवसा लावू नये रात्री लावावे, आठवड्यातून दोनदा उन्हात केस सुकवा, स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, बाहेरच्या वस्तू, पदार्थ खाऊ नये कारण प्रिझरवेटीव्ह केलेल्या असतात.
(ads)
जेवणामध्ये गाजर, मुळा, आवळा, बोर खाल्ले पाहिजे, पाणी कमी पिल्याने सुद्धा किडनी स्टोनचा आजार होऊ शकतो, पाणी पिताना तोंडामध्ये घोळायला पाहिजे, रात्री आठ तास झोप घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांशी बोलले पाहिजे, वरिष्ठांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, एकाचा राग दुसऱ्यावर काढू नये, नखे वाढवू नये, टॉवेल दर तीन दिवसांनी धुतले पाहिजे, एक दुसऱ्याचे कपडे वापरू नये, गुटखा खाल्ल्याने कॅन्सर होतोच, आपले सर्व खाण्याच्या वस्तू सुद्धा स्वच्छ ठेवल्या पाहिजे, असे त्यांच्या समुपदेशनामध्ये सांगितले.
(ads)
दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. रेखा पाहूजा एस एस मनियार विधी महाविद्यालय जळगाव यांनी सायकॉलॉजिकल इशूज आणि सोशल मीडिया अँड इम्पॅक्ट ओन मेंटल हेल्थ या विषयावर समुपदेशन केले जर कोणी मोबाईलवर रिलस पाहत असतील तर ते तीन तासांमध्ये जवळपास ४५० रील्स पाहतात असे अभ्यासांती दिसून आले. सोशल मीडियाचा खूप प्रभाव वाढलेला आहे. आपण सात सात तास मोबाईलच पाहत बसतो याचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होतो त्याचे कारण म्हणजे अक्सीबिलिटी, मोफत उपलब्धता, मोबाईलची सवय लागणे आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर चॅटिंग करणे हे सुद्धा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत असतात असे त्यांच्या समुपदेशनामध्ये सांगितले.
(ads)
तिसऱ्या सत्रामध्ये प्रा मुकेश चौधरी, कला व विज्ञान महाविद्यालय भालोद यांनी व्यावसायिक समुपदेशन या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी व्यक्तिगत भावनिक समस्या काय आहेत ह्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या समस्या सोडविणे म्हणजे समुपदेशन होय. विद्यार्थ्यांच्या आवडी - निवडी नुसार त्यांची क्षमता काय आहे. हे जाणून घेण्यासाठी समुपदेशन काम करते असे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितले.
(ads)
चौथ्या सत्रामध्ये डॉ. संतोष बी. गव्हाड व्ही.एस. नाईक महाविद्यालय रावेर यांनी विवाहपूर्व समुपदेशन या विषयावर मार्गदर्शन केले त्यांनी विवाह म्हणजे काय? विवाह नंतरच्या समस्या,समज-गैरसमज या बाबतीत मार्गदर्शन केले. विवाहपूर्व समुपदेशनामध्ये त्यांनी जे पती-पत्नी होऊ इच्छितात त्यांनी त्यांच्यामध्ये समज निर्माण व्हावी, मानसिक भावनेची जाणीव निर्माण व्हावी, जोडीदाराची पूर्वतयारी, मानसिक आणि भावनिक तयारी करणे, विवाहासंबंधीचे गैरसमज दूर करणे, विवाह का करायचा? विवाह आपल्या अपत्यासाठी विवाह करायचा की विवाह करणे बंधनकारक आहे का ?नाही आपल्या सहचरणीसाठी विवाहाचे वय मुलींसाठी 18 तर मुलांसाठी 21 वर्षे विवाह हे संघर्ष आहे का? असे प्रश्न विचारून त्याची उकल करत उत्तर दिले . विवाहपूर्व समुपदेशन करणे गरजेचे आहे कारण दोघांनी एकमेकांना समजून घेतले तर त्यांचा संसार सुखाचा होतो.
(ads)
त्यानंतर खुली चर्चा विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आली. समारोप समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी अंजने यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक एन व्ही पाटील हे उपस्थित होते.एन व्ही पाटील यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. निकीता कोळी, जागृती पाटील,सागर महाजन, या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर,करावं विज्ञान महाविद्यालय पाल, कला व विज्ञान महाविद्यालय भालोद, श्री व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर, कला व विज्ञान महाविद्यालय यावल येथील विद्यार्थी,प्राध्यापक कार्यशाळेत सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. जे.पी. नेहेते व प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. शेवटी या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. व्ही एन रामटेके यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले या .



