ऐनपूर : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना एकका मार्फत 'एड्स मुक्त महाराष्ट्र' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे. बी अंजने यांनी एड्सग्रस्त व्यक्तीशी हात मिळवणी केली, त्यांचा स्पर्श झाला तर एड्स होतो हा समाजातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न युवकांनी करावा असे सांगितले.
(ads)
मुख्य मार्गदर्शक विश्वास पाटील ग्रामीण रुग्णालय पाल यांनी विद्यार्थ्यांना एड्स मुक्त महाराष्ट्र हे ध्येय साध्य करायचे आहे म्हणून युवकांनी एड्स होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रक्तदान करताना तसेच रक्त घेतांना एचआयव्ही चाचणी करून घेतल्या पाहिजेत. रक्ताद्वारे आजाराचे संक्रमण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.असेत्यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितले. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी केले.
(ads)
या कार्यक्रमाला प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. पी.आर. महाजन व राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी विभागीय समन्वयक डॉ. जे.पी. नेहेते हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजनासाठी प्रा. प्रदीप तायडे प्रा. विलास पाटील, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा. अक्षय महाजन व श्री हर्षल पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे आभार प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी मानले.



