ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात इंटर्नशिप व ऑन जॉब ट्रेनिंग या विषयावर मा. प्राचार्य डॉ जे. बी. अंजने यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत डॉ जे पी नेहेते यांनी इंटर्नशिप व ऑन जॉब ट्रेनिंग वर मार्गदर्शन केले. यात त्यांनी इंटर्नशिप व ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे काय, त्याला क्रेडिट किती असतात व ते कशा पद्धतीनी आपल्या भविष्यासाठी महत्वाचे आहे ते सांगितले. तर उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव यांनी इंटर्नशिप व ऑन जॉब ट्रेनिंग मुळे तुम्हाला नोकरीत कशा पद्धतीने उपयोगाचे आहे ते सांगितले. तर प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इंटर्नशिप व ऑन जॉब ट्रेनिंग ही का देण्यात आली त्या संदर्भात तसेच महाविद्यालयाचे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत प्रा हेमंत बाविस्कर, प्रा एस आर इंगळे, प्रा व्ही. एच. पाटील, प्रा. संकेत चौधरी, प्रा. केतन बारी, प्रा मिलिंद भोपे, प्रा वैष्णवी पाटील, प्रा कोमल सुतार हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. एच. एम. बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एस. एन. वैष्णव यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी श्री हर्षल पाटील, श्री अनुराग पाटील, श्री श्रेयस पाटील यांनी मेहनत घेतली.



