रावेर येथे मोफत शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर-यावल विधानसभेचे आ. अमोल जावळे यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून आणि रावेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा संगीता भास्कर महाजन तसेच प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक अरुण दत्तात्रय अस्वार ,नगरसेविका योगिता भूषण महाजन यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली रावेर शहरातील श्री.आवजीसिद्ध महाराज मंदिरा जवळ बारी वाडा येथे मोफत शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

(ads)

शिबिर हे आपले सरकार सेवा केंद्र चालक नकुल बारी,ललित सोनार (निंभोरा बु )तसेच त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने राबविण्यात आले असून या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ मिळवून देणे हा आहे. शिबीरात नागरिकांना विविध शासकीय योजना, लाभ, कागदपत्र तपासणी, अर्ज प्रक्रिया, मार्गदर्शन आणि नोंदणी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अनेक नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपल्या हक्काच्या योजनांसाठी अर्ज सादर केले.

(ads)

विशेषतः महिला,जेष्ठ नागरिक,शेतकरी,युवक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे शिबीर उपयुक्त ठरले.या उपक्रमामुळे शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवला.ज्या मुले रावेरकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.नागरिकांनी नेतृत्वावरील विश्वास व्यक्त करत नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेचा गौरव केला.याशिबिरात नगरसेवक पद्माकर महाजन ,नगरसेवक अरुण अस्वार ,नगरसेविका योगिता महाजन,सामाजिक कार्यकर्ते भास्कर महाजन ,निलेश अस्वार हे उपस्थित होते.

 (ads)

नागरिकांच्या विविध शासकीय कामांची सोय करून देण्याच्या उद्देशाने रावेर शहरातील प्रत्येक प्रभागात हे शिबीर सुरु राहणार असून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!