( उत्तर महाराष्ट्र ब्युरो चीफ हमीद तडवी)
ग्वालियर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची जाळपोळ केल्याची समाजात तीव्र संतापाची लाट उसळविणारी घटना घडली असून, या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.या प्रकरणातील दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच जातीवादी व समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणाऱ्या अनिल मिश्रा याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी रावेर येथील तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना अधिकृत निवेदन देण्यात आले.
(ads)
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून त्यांच्या प्रतिमेचा अवमान करणे म्हणजे देशाच्या संविधानावर आणि राष्ट्रीय एकतेवर घाला घालण्यासारखे आहे. अशा समाजकंटकांवर वेळीच कठोर कारवाई झाली नाही, तर ऑल इंडिया पँथर सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
(ads)
या वेळी युवा रावेर तालुका अध्यक्ष जितु भाऊ इंगळे. तालुका उपाध्यक्ष श्रावण भालेराव . योगेश लहासे. महेंद्र बगाडे. आदित्य गजरे.सागर पानपाटील. प्रथमेश भास्कर. रोहन हिवरे. गौरव जाधव. पवन गाढे. अभि भालेराव. रोहित तायडे. महेंद्र वाघ. सागर भालेराव. अरबाज शेख..आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




