ऐनपूर महाविद्यालयात हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधी यांना अभिवादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  


ऐनपूर : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना एकका मार्फत हुतात्मा दिनानिमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाचे  प्रमुख मार्गदर्शक प्रा. प्रदीप तायडे यांनी सत्याचे प्रयोग याविषयी मार्गदर्शन केले तसेच दुसरे मार्गदर्शक प्रा. अक्षय महाजन यांनी महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहां विषयी माहिती सांगितली. 

(ads)

प्रास्ताविक प्रा हेमंत बाविस्कर यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ. व्ही.एन. रामटेके यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे बी अंजने यांनी महात्मा गांधी यांचे सत्य, अहिंसा या तत्त्वाविषयी मार्गदर्शन केले या व्याख्यानाला महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक व प्राध्यापककेतर कर्मचारी उपस्थित होते. 

(ads)

या कार्यक्रमाकरिता एच.एम. बाविस्कर, डॉ. व्ही एन रामटेके, प्रा.एस.पी.उमरिवाड ,डॉ. एन.यू. बारी, प्रा. व्ही. एच. पाटील, प्रा. अक्षय महाजन, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा. अंकुर पाटील, प्रा. जे.पी. नेहेते, प्रा. पी.आर. महाजन, प्रा.एस बी महजन, यांनी सहकार्य केले शेवटी मान्यवरांचे आभार उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव यांनी मानले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!