सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना एकका अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा पंधरवाडा निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे प्राचार्य जे. बी. अंजने यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा निमित्त विद्यार्थ्यांना रस्त्याने चालत असताना नियमांचे पालन करावे. प्रत्येक चिन्हांचा अर्थ समजून घेतला पाहिजे.नियमांचे पालन केले पाहिजे. कुठलीही नशा न घेता वाहन चालवावे असे तरुणांना आव्हान केले.
(ads)
या व्याख्यानाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी केले या व्याख्यानाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजना मध्ये प्रा. प्रदीप तायडे प्रा. अक्षय महाजन डॉ.पी.आर. गवळी प्रा. ज्ञानेश्वर कोळी प्रा.विलास पाटील यांनी सहकार्य केले शेवटी मान्यवरांचे आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.पी. उमरीवाड यांनी मानले .शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने या व्याख्यानाची सांगता करण्यात आली



