(रावेर तालुका प्रतिनिधी: आदित्य गजरे)
अंधारमळी: जि. प. मराठी शाळेत नुकतेच संपन्न झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. या उपक्रमाचे नियोजन व आयोजन श्री शेखर तडवी सर आणि स मीना सौ तडवी मॅडम यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.श्री मा. साहेबराव शिंदे, गटशिक्षणाधिकारी, रावेर श्री मा. मनोज दादा चिंचोरे, केंद्रप्रमुख खिरोदा व अंधारमळी गावाचे पोलीस पाटील श्री रमजान तडवी दादा , शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य: अध्यक्ष श्री सलीम तडवी, ग्रामपंचायत सदस्या सौ. हमीदा तडवी व सौ गुलशान तडवी
यांची होती विशेष उपस्थिती:
श्री फकीरा तडवी, CRPF जवान व श्री नितीन भंगाळे सर, श्री आर. टि . कुमावत सर माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, आश्रम शाळा तसेच सर्व ग्रामस्थ, पालक व गावकरीकार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम सादर केले.
(ads)
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि शालेय कौशल्य विकसित झाले. तसेच, शिक्षणाची आवड वाढवणे, सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि व्यक्तिमत्व विकासास चालना देणे या उद्दिष्टांची पूर्तता झाली.शेखर सर आणि मीना मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले व त्यांचा उत्साह वाढवला.
(ads)
पालक व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे स्वागत केले व मुलांच्या प्रगतीसाठी आभार व्यक्त केले.वार्षिक स्नेहसंमेलनामुळे शाळेतील वातावरण आनंदी, उत्साही आणि प्रेरणादायी झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सामाजिक विकासात लक्षणीय योगदान झाले आहे.



