सांगवी बु!! येथील ५९ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; यावल पोलीस ठाण्यात नोंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


तालुका प्रतिनिधी (राहुल जयकार)

यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावातील कैलास वासुदेव कोळी ५९ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हरवलेली व्यक्ती नोंद करण्यात आली आहे.

(ads)

मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्यक्ती दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता घरातून बाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. सर्वत्र शोध घेऊनही कोणताही ठावठिकाणा न लागल्याने अखेर १९ जानेवारी २०२६ रोजी यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

(ads)

पोलीस ठाण्यात दाखल नोंदीनुसार, संबंधित व्यक्ती पुरुष असून त्यांचे वय ५९ वर्षे आहे. या प्रकरणाचा तपास यावल पोलीस करत असून, नागरिकांनी संबंधित व्यक्तीबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर व्यक्ती आढळून आल्यास उदय कोळी यांना संपर्क साधावा.. 8600105073

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!