शेगांव संतनगरीत मुकनायक पत्रकार मेळावा संपन्न ; संपूर्ण महाराष्ट्रातून होती मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधवांची उपस्थिती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


दिल्लीतील पत्रकारांनीच देशाचे वाटोळे केले- भुपेंद्र गणवीर

बुलडाणा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : राष्ट्रीय माध्यमांतील पत्रकारांनी दिल्लीत केवळ भांडवलशाही आणि सत्तेची राखण केली. त्यांनी मुकनायक पत्रकारिता केली असती तर देशात आर्थिक, सामाजिक विषमता दिसली नसती. देशाचे वाटोळे करण्यात सत्ताधाऱ्यांइतकेच दिल्लीतील पत्रकारांचे योगदान आहे. या शब्दात प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ संपादक भूपेंद्र गणवीर यांनी बुरसटलेल्या पत्रकारितेवर संतनगरी शेगांवात प्रहार केले.

(ads)

ते मुकनायक पत्रकार दिन राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा-२०२६ आणि नॅशनल व्हाईस मीडिया फोरम वर्धापन दिनाच्या संयुक्त कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. मंचावर मराठी अभिनेता भरत गणेशपुरे, लॉर्ड बुध्दा टीव्हीचे संचालक सचिन मुन, फोरमचे राष्ट्रीय  अध्यक्ष उत्तम वानखेडे, राष्ट्रीय सचिव प्रकाश सरदार अॅड. झाल्टे, दादाभाऊ अभंग, दिनेश निखारे, किरण उपाध्ये आदी होते. गणवीर पुढे म्हणाले,  स्वदेशी आंदोलनाच्या नावावर संघ ,भाजपाने देशातील जनतेला मुर्ख बनविले. भांडवलशाहीला खतपाणी दिले. ती भांडवलशाही व जातीयवादी शक्ती आज हातात घालून नव्वद टक्के जनतेचे शोषण करीत आहे.२०१४ नंतर हे स्वदेशी आंदोलन कुठे गेले ? असा सरळ प्रश्न केला. तसेच सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशातील ८० कोटी जनता रेशनच्या धान्यावर जगत आहे.

(ads)

 त्या विरूघ्द ते कां लिहित,बोलत नाहीत ? असा प्रश्न केला.  मुकनायक पत्रकारिता प्रश्न विचारणारी पत्रकारिता होती. ज्या काळात धर्मसंस्थांना व उच्चवर्णियांना प्रश्न विचारणे गुन्हा होता. त्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म माणसाला कमी लेखतो. तो धर्म की अन्याय असा प्रश्न विचारला होता. गुलामी फक्त साखळदंडात नसते. ती मनातही असते असे सांगून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा स्वाभिमानी विचार दिला. आज मुकनायक विचार घराघरात पोहचला. त्यातून घराघरात शिक्षणाचा सुर्य उगवला. त्यातील तुम्ही काही सूर्य या मेळाव्यात आहात.

(ads)

मेळाव्यातील पत्रकारांना उद्देशून भूपेंद्र गणवीर म्हणाले, आपण व्यवस्थे विरूध्द साक्ष देणारे साक्षीदार म्हणून जमलो आहात. तुम्ही केवळ बातम्या देणारे लोक नाहीत. तुम्ही इतिहासाला दिशा देणारे आहात. या भूमिकेचे मूळ मुकनायक पत्रकारितेत आहे. जखमा आमच्या लपवल्या इतिहासाच्या पानांनी. मुकनायक आला तेव्हा रक्त बोलले शब्दांनी! असे भावनिक उदगार काढीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मुकनायक पत्रकारिता पुढे न्या असे आवाहन केले.

(ads)

लॉर्ड बुध्दा टिव्हीचे संचालक सचिन मून यांनी पुढचा मुकनायक पत्रकार दिनाचा मेळावा दीक्षाभूमीवर घेण्याची घोषणा केली. लॉर्ड बुध्दा हा ऐकमेव बहुजन चॅनेल आहे. बावीस राज्यात लॉर्ड बुद्धा टिवी दिसत आहे असे सांगून या चॅनेलची आतापर्यंतची संघर्षमय वाटचाल "झोपडपट्टी ते देशपातळी" असा लेखाजोखा मांडला. तेव्हा सभागृहात भावनिक शांतता पसरली होती.

(ads)

मराठी अभिनेते भरत गणेशपुरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून देशावर मोठे उपकार केले. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. ते जागतिक विचारधन आहे. त्यांचा एक ग्रंथ  वाचताना आपली दमछाक होते. त्या विचारांच्या पत्रकारांच्या मेळाव्यात मला उपस्थित  राहण्याची संधी दिल्याबाबत आयोजकांचे आभार मानले. दादाभाऊ अभंग यांनी भीमा कोरेगाव स्मारक व परिसर ताबा-संघर्षाची माहिती दिली. तालुका मँजिस्टेड ते हायकोर्ट अशा अकरा ठिकाणी आपण जिंकलो. तरी अद्याप ताबा मिळाला नाही. या संघर्षाला साथ द्या असे आवाहन केले. तर फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी संघटनेची माहिती दिली.आता संघटना तीन राज्यात असून २४ हजार सदस्य नोंदणी झाल्याचे सांगितले.

(ads)

*भूपेंद्र गणवीर, सचिन मुन यांचा पुरस्काराने सन्मान*

▪या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक भुपेंद्र गणवीर यांचा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आणि लॉर्ड बुध्दा टीव्हीचे संचालक सचिन मून यांचा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट माध्यम संघटक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबाबत मराठी अभिनेता भरत गणेशपुरे यांच्या हस्ते शाल, स्मृर्तीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय अन्य  पत्रकारांनाही  पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये सनद पटेल, अनिल उंबरकर, संदिप बडगे, महेश बनसोडे, मोहित दामोदर, आतिश खराटे आदिंचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिनेश निखाडे, किरण उपाध्ये,पदमा मोहड आदींनी परिश्रम घेतले. 

संपूर्ण कार्यक्रम पहा(येथे क्लिक करा)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!