रावेर पोलिस स्टेशन व नगरपालीका कर्मचारी यांनी रावेर शहरात रहदारीस अडथळा निर्माण करणारे हातगाडया व पानटपरी चालक यांच्यावर संयुक्तपणे केली कठोर कारवाई

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर शहरात चालु असलेल्या १० वी व १२ वी च्या विदयार्थ्यांची परीक्षा चालू असल्याने विदयार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्याकरीता वाहतुकीस सामोरे जावे लागत असल्याचे निर्दशनास आले होते. तसेच काही शाळकरी विदयार्थी हे पानटपरी जवळ घोळका करुन गर्दी करीत असल्याचे तक्रारी नागरीकांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यावरुन आज रोजी नगरपालीका तसेच रावेर गुन्हे शोध पथकाने खालिल संयुक्त कार्यवाही केलेली आहे.

(ads)

नगरपालीका व रावेर पोलिस स्टेशन कडील अमंलदार यांनी रावेर शहरातील गर्दी होत असलेल्या बसस्टैंड परीसरात हातगाडी चालक ०१) शे. नजमुधीन शे. कदरुद्यीन वय ४१ रा. बारी वाडा, ०२) तय्युब अली अकबर अली वय-५२ रा हमाम वाडा ०३) शेख जावेद थे. सईद रा मदीना कॉलनी ०४) शेख वकार शेख सलीम रा. उटखेडा रोड सवेर ०५) जावेद खान फिरोज खान रा. फतेह नगर रावेर यांच्या वर भारतीय न्याय संहीता कलम २८५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे तसेच नगरपालीके तर्फे त्यांना समजफत्र देवून कारवाई करण्यात आलेली आहे.

(ads)

तसेच रावेर शहरात मुख्य रस्यावर दोन प्रमुख शाळा असल्याने शाळकरी मुलांची नेहमीच वर्दळ असते सदर शाळेच्या आजुबाजुच्या परीसरात असणाऱ्या पानटपरी चालक नामे ०१) विश्वनाथ महाजन (महाजन पान सेंटर) बसस्टैंड ०२) आकाश बाळू चौधरी (आर्शिवाद पान सेंटर) 03) जफर खान रहेमतुल्ला खान (मास्टर पान सेंटर) बसस्टैंड ०४) सुनिल चंपालाल राउत (संगीता पान सेंटर) ०५) दिलीप फतु बारी (विजय पान सेंटर) ०६) शब्बीर अली शौकत अली ०७) शेख फईम थे. ईब्राहीम ०८) सुनिल रघुनाथ शिरतुरे सर्व रा. रावेर यांच्यावर वैयक्तीकपणे सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने (जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनीमयन) अधिनियम २००३ च्या कलम ६ (ब), २४ प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

(ads)

सदर कार्यवाही ही मा. डॉ. श्री महेश्वर रेडडी सो पोलिस अधिक्षक जळगांव मा. श्री अशोक नरवाते सो अप्पर पो. अधिक्षक जळगांव विभाग, मा. श्री अनिल बडगुजर सो पोलिस उपअधिक्षक फैजपुर विभाग यांच्या मार्गदर्शनाने पोलिस स्टेशन रावेर मधील पो. नि. डॉ विशाल जयस्वाल, गुन्हे शोध पथकातील, पो.हे.कों/- ईश्वर चव्हाण, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकार शेख, गजानन बोने, तसेच नगरपालीकेचे सुधीर माळी बांधकाम अभियंता, प्रशांत कोकाटे, नितेश वांगरे, अभिजीत लबडे, युवराज गोयर, निलेश महाजन, तुषार रायपुस्कर, योगेश भोई, वाजीद खान, गणेश रणसिंगे अधिकारी / कर्मचारी यांनी संयुक्तपणे केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!