धार्मिक वृत्तीमुळेच अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांतून प्रभू रामचंद्रांच्या पावन ओंकारेश्वरचा विकास – माजी आमदार अरुणदादा पाटील

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)

श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर हे या परिसरासह संपूर्ण मतदारसंघातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या माध्यमातून रावेर–यावल मतदारसंघाचा सर्वांगीण विकास मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अरुणदादा पाटील यांनी केले. आमदार अमोलभाऊ जावळे हे धार्मिक वृत्तीचे लोकप्रतिनिधी असल्याने मतदारसंघातील धार्मिक व पर्यटनस्थळांचा विकास वेगाने होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून आणि आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या विशेष प्रयत्नातून भोकरी येथील श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये ५० लक्ष रुपये खर्चून सभागृह बांधकाम, २५ लक्ष रुपये खर्चून मंदिर परिसर सुशोभीकरण, तसेच १५ लक्ष रुपये खर्चून प्राचीन रामकुंडाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या विकासकामांचा लोकार्पण सोहळा बाला महाराज व मुकेश महाराज यांच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी भजन-कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.


आजपर्यंत जी कामे झाली नाहीत, ती पूर्ण करण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे सातत्याने प्रयत्नशील असून प्रत्येक प्रश्नावर ते ठामपणे काम करत आहेत, असे प्रतिपादन भाजप प्रदेश सदस्य सुरेश धनके यांनी केले.


आमदार अमोलभाऊ जावळे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी लाभल्यास विकासकामांवर काय सकारात्मक परिणाम होतो, हे सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांवरून स्पष्टपणे दिसून येत असल्याचे मत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू महाजन यांनी व्यक्त केले. “असे कोणतेही क्षेत्र नाही, जिथे आमदार अमोलभाऊ जावळे यांचे कार्य पोहोचलेले नाही,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.


या कार्यक्रमास माजी आमदार अरुण पाटील, सुरेश धनके, नंदू महाजन, विजय पाटील, अशोक पाटील, आर. एस. पाटील, प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, सुनील पाटील, पिके महाजन, संदीप सावळे, दुर्गादास पाटील, दिलीप पाटील, राजन लासूरकर, भास्कर महाजन, राजेश शिंदे, अरुण शिंदे, अमोल पाटील, भूषण महाजन, विजय महाजन, सी. एस. पाटील, अरुण अस्वार, महेंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, लखन महाजन, अ‍ॅड. सूर्यकांत देशमुख, रवींद्र महाजन, दुर्गेश पाटील, पवन चौधरी, रवी महाजन, बाळा आमोदकर, उमाकांत महाजन, साजन चौधरी, सुनील वानखेडे, अनंत महाजन, चेतन पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.


भगवान प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीवरील श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिराच्या विकासामुळे परिसराच्या धार्मिक, सांस्कृतिक तसेच पर्यटन महत्त्वात अधिक भर पडत असून, भाविकांसाठी ही विकासकामे मोठी पर्वणी ठरत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!