विवरा ता रावेर (जमील शेख)
रमजानच्या मुकद्दस महिन्याची सुरुवात झाली असून, मुस्लिम समाजात इबादत आणि श्रद्धेचे वातावरण आहे. याच दरम्यान विवरा ता रावेर येथील शेख खलील शेख अहमद यांचा मुलगा शेख अर्सलान शेख खलील यांनी अवघ्या ६ वर्षीय चिमुकल्याने दोन रोजे ( उपवास ) केले आहे,दोन रोजे पूर्ण करून अल्लाप्रती आपली निष्ठा (अकीदा) व्यक्त केली आहे. त्याच्या या धैर्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
(ads)
विवरे येथील रहिवासी शेख खलील शेख अहमद यांचा सुपुत्र शेख अर्सलान याने पहाटे 'सेहरी' करून रोजा ठेवण्याचा निर्णय घेतला. दिवसभराची तहान आणि भूक यांचा संयम राखत त्याने सायंकाळी 'ईफ्तार'च्या वेळी आपला पहिला रोजा यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यानंतर दुसरा रोजा ही पुर्ण केला इतक्या लहान वयात कडक उन्हाची तमा न बाळगता पुर्ण दिवस अन्न,पाणी काही न घेता त्याने दोन रोजे (उपवास) ठेवले आहे, या यशाबद्दल विवरे गावत मुस्लिम बांधवांकडून आणि नातेवाईकांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





