https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6

 






 

Raver Crime News: रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने 24 तासाचे आत जबरी चोरी करणारी टोळी केली जेलबंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

Raver Crime News: रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने 24 तासाचे आत जबरी चोरी करणारी टोळी केली जेलबंद

रावेर (राहुल डी गाढे) : रावेर पोलीस स्टेशन येथे दिनांक 19/02/2026 रोजी फिर्यादी गोवर्धनदास सफरमल कोटवाणी किरणा होलसेल व रिटेल व्यापारी रा. रावेर ता. रावेर हे दिनांक-18/02/2026 रोजी सायंकाळी 20.45 वाजता विवरे बु॥ गावी त्यांचे दुकानातील किराणा सामान खरेदी करणारे ग्राहक यांचेकडुन उधारीचे पैसे गोळा करुन विवरे बस स्टॅण्डवर रावेर कडे येण्यासाठी उभे असतांना एक अनोळखी मोटार सायकल चालक हा त्यांचेजवळ थांबवून मी रावेर जात आहे माझ्या सोबत चला असे सांगुन फिर्यादी यांना त्याचे मोटार सायकल वर बसवुन रावेर कडे येत असतांना पारश्या नाल्याजवळ चौकीचे बाजुला शेताचे बाजुला मोटार सायकल घेवून तेथे उभे असलेले दोन अनोळखी इसमांजवळ थांबविली व फिर्यादी यांना धमकी देवुन त्यांचे जवळ असलेल्या पॅन्टचे खिश्यातील 15000/- रोख रुपये जबरदस्तीने काढून तेथुन पळुन गेले त्यावरुन फिर्यादी यांनी रावेर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरुन रावेर पो. स्टे गुरनं 77/2026 भारतीय न्याय संहीता कलम 304 प्रमाणे दिनांक 19/02/2026 रोजी गुन्हा दाखल आहे.

(ads)

सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे व मुद्देमाल हस्तगर करणे बाबत मा. पोलीस अधिक्षक डॉ.श्री महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक मा. अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी चोपडा उपविभाग चोपडा अण्णासाहेब घोलप, पो.नि. डॉ विशाल जयस्वाल यांनी मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केले होते.

(ads)

वरील प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास चालु असतांना पोना 3025 कल्पेश मुरलीधर आमोदकर, पोका 1348 सुकेश शब्बीर तडवी, पोकों 2168 प्रमोद सुभाष पाटील, पोकों 2752 विशाल शिवाजी पाटील, पोकों 2836 संभाजी विजागरे, पोकाँ 1829 श्रीकांत शिरीष चव्हाण, पोकों 3466 गजानन लक्ष्मण बोने, अशांनी गुप्त बातमी दारामार्फत गुन्हयातील आरोपीची माहीती मिळवुन गुनह्यातील आरोपीचा शोध घेवुन गुन्हयातील आरोपी 1) मोहम्मद उबेद मोहम्मद एजाज रा. नागझिरी चौक रावेर 2) शेख मोईन शेख नईम रा. विवरे बु ॥ ता. रावेर जि. जळगाव 3) रेहानखान जावेद खान रा. विवरे बु॥ ता. रावेर जि. जळगाव यांना ताब्यात घेवुन सदर गुनह्यात अटक करम्यात आली असुन आरोपी यांच्याकडे सखोल तपास केला असता गुनह्याची उकल करुन चोरीस गेला माल 15000/- रुपये रोख व गुन्हयात वापरण्यात आलेली 35000/- रुपये किंमतीची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटार सायकल क्रमांक MH-02-CN-5376 गुन्हयाचे तपासकामी हस्तगत करण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पो.उप. निरी सुनिल मोरे हे करीत आहेत.

(ads)

सदरची कार्यवाही ही मा पोलीस अधिक्षक डॉ श्री मेहश्वर रेड्डो सो., अपर पोलीस अधिक्षक श्री अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी चोपडा उपविभाग चोपडा अण्णासाहेब घोलप, पो.नि. डॉ विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी सुनिल मोरे, पोना 3025 कल्पेश मुरलीधर आमोदकर, पोकौँ 1348 सुकेश शब्बीर तडवी, पोकाँ 2168 प्रमोद सुभाष पाटील, पोकाँ 2752 विशाल शिवाजी पाटील, पोकाँ 3254 विकार गयासोद्दीन शेख, पोकों 2836 संभाजी बिजागरे, पोकाँ 1829 श्रीकांत शिरीष चव्हाण, पोकाँ 3466 गजानन लक्ष्मण बोने, यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!