https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6

 






 

ऐनपूर महाविद्यालयास तायक्वांदो स्पर्धेत रजत पदक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत ऐनपूर महाविद्यालयाने रजत पदक प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्राचल विनोद कोळी हिने उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने,प्रा डॉ. पी. आर. गवळी,प्रा अक्षय महाजन, उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विभागीय स्पर्धा श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर येथे दि. २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!