सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या व्याख्यानाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्रमुख मार्गदर्शक जे.बी. अंजने यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते बहुजनांचे उद्धार करते, सामाजिक न्यायाचे, धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते आणि सर्व जनतेचे राजे झाले. तसेच महाराजांच्या राज्यभिषेकाचा संपूर्ण इतिहास सांगितला. या व्याख्यानाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रमुख कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी केले या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. उमरीवाड प्रा. व्ही.एच.पाटील डॉ.पी.आर. गवळी प्रा. केतन बारी यांनी सहकार्य केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी केले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





