दिपनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - येथून जवळच असलेल्या फेकरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन आज ता.16 रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रशांत निकम होते. प्रमुख म्हणून माजी सरपंच राहुल वाघ, कौतिक वाघोदे हे उपस्थित होते. यांच्या प्रतिमेस पुष्पहार व मेणबत्ती वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नवीन कार्यकारणी निवडण्यासाठी यावेळेस महिलांना प्राधान्य देण्याचे एकमत झाले. महिलांना फक्त चूल आणि मूल यावर सुमित न राहता. आजच्या आधुनिक युगातील स्त्री ही कोणत्याच क्षेत्रात मागे नाही. आज पर्यंत पुरुषांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येत होती. परंतु यावर्षी वार्डातील ज्येष्ठ आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या सोनाबाई सोमा निकम यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सदस्य जयश्री संजय वाघ, ज्योती जीवन सुरवाडे, अरुणा संजय दाभाडे, कल्पना बोदडे यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून मनोरमा अरुण निकम यांची निवड करण्यात आली. तसेच सेवानिवृत्त पोस्टमास्तर जिजाबाई भागवत अडकमोल यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली. महिला अध्यक्ष निवडीनंतर अध्यक्षांनी सांगितले की या वर्षाची मिरवणूक ही सर्व समाजातील सोबत घेऊन एक आगळीवेगळी आणि समाजाला एक दिशा देणारी मिरवणूक राहील विविध पंचरंगी कार्यक्रम घेऊन मनोरंजनासोबतच एक दिशादर्शक व सर्व धर्मसमावेशक अशी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात येईल. यावेळी वार्डातील धम्म उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
फेकरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत : प्रथमच महिला अध्यक्ष सर्वत्र कौतुक
शुक्रवार, फेब्रुवारी २०, २०२६





