रावेर (राहुल डी गाढे ) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त येथिल तक्षशिला बुद्ध विहारात दिनांक १९ रोजी भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती रावेर शहर स्थापन करणेसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आणि सर्वानुमते पुढील प्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आली. जगदीश घेटे (अध्यक्ष) , बाळू शिरतुरे (उपाध्यक्ष), संघरत्न दामोदरे (सचिव), राजेंद्र अटकाळे (सहसचिव), दिपक नगरे (कोषाध्यक्ष), प्रकाश महाले (सहकोषाध्यक्ष), दिलीप कांबळे, विकास अवसरमल ,ॲड. योगेश गजरे, ॲड. दिपक तायडे, पंकज वाघ (सदस्य) अशाप्रकारे सन २०२६ साठी कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.
(ads)
बैठकीला नगरसेवक पिंटू वाघ, संघरक्षक तायडे, मेघराज शेगावकर, रुपेश गाढे, विकास अटकाळे,अमोल तायडे, संकित तायडे, अजय तायडे, सुनिल शिरतुरे, सम्यक इंगळे, राजू गजरे, अक्षय मशाने, विनोद शिरतुरे, विशाल तायडे, निलेश तायडे, विनोद दामोदरे, शुभम घेटे,विकास अटकाळे, रमण गजरे, रविंद्र तायडे, करण मोरे, लखन मोरे, प्रथमेश गजरे , करण घेते,यांचे सह भिमगर्जना व्यायम शाळा, सिद्धार्थ व्यायम शाळा, सिद्धार्थ, फुले, आंबेडकर व्यायाम शाळा, भिमशक्ती मित्र मंडळ, रमाई मित्र मंडळ, प्रशिक व्यायाम शाळा, तथागत व्यायाम शाळांचे सदस्य व शेकडो समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





