ऐनपुर महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



 ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती मा. प्राचार्य डॉ जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उप प्राचार्य डॉ एस एन वैष्णव हे होते. सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरचे हस्ते करण्यात आले. डॉ एम के सोनवणे यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्र समजावून सांगितले तर डॉ एस एन वैष्णव यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. या नंतर महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा एस आर इंगळे यांनी केले. या स्वच्छतेच्या कार्यक्रमात डॉ डी बी पाटील, प्रा अक्षय महाजन, प्रा मिलिंद भोपे, प्रा प्रदीप तायडे, प्रा जयंत नेहेते, प्रा संदीप साळुंखे, डॉ पी आर महाजन, श्री श्रेयस पाटील, श्री अनुराग पाटील, श्री हर्षल पाटील यांनी भाग घेतला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!