सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे जागतिक मातृभाषा दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी अध्यक्ष म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ रेखा पाटील या होत्या.प्रमुख वक्ते प्रा डॉ महेंद्र सोनवणे यांनी आपल्या व्याख्यानात मातृभाषा दिनाचे सार्वभौम महत्व समजुन सांगितले.तसेच त्यांनी सांगितले की १९९९ ला युनेस्कोने २१ फेब्रुवारी रोजी मातृभाषा दिन साजरा करावा असे ठरवले .
भावनांच्या अभिव्यक्तीचे भाषण म्हणजे मातृभाषा .
जगात एकूण सहा हजार बोलीभाषा बोलल्या जातात .
भारत पाकिस्तान विभाजनानंतर पाकिस्तानचे राष्ट्रीय भाषा ही उर्दू मानली गेली . परंतु तिथे बहुसंख्य जनता ही बंगाली होते .बंगाली भाषेसाठी तेथील लोकांनी आपली भाषा टिकवण्यासाठी बलिदान दिलेले आहे. म्हणून युनेस्कोला असा निर्णय घ्यावा लागला की जगात प्रत्येक ठिकाणी जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जावा .त्या अनुषंगाने २१ फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो .
जेव्हा एखादी भाषा लोप पावते तेव्हा स्वाभाविकच तेथील संस्कृती ही नामशेष होते. अध्यक्षीय भाषणात प्रा डॉ रेखा पाटील यांनी मातृ भाषेचे सखोल महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच या कार्यक्रमास उप प्राचार्य प्रा डॉ सतिष वैष्णव, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहूसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.





