महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते चिनावल ग्रा.पं.चा गौरव : 'माझी वसुंधरा अभियान ४.०' प्रथम पुरस्कार
रावेर (राहुल डी गाढे) : मागील वर्षी 'माझी वसुंधरा ४.०' या अभियानांतर्गत रावेर तालुक्यातील चिनावल या ग्रामपंचायतीला राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे. जल, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी या पंचतत्वावर आधारित पर्यावरण पातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीचा माझी वसुंधरा ४.० मध्ये ग्रामपंचायतने सहभाग घेऊन राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून २ कोटी २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळवले होते.
(ads)
त्यासाठी चिनावल गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. ज्योती संजय भालेराव, उपसरपंच शाहीन बी शेख जाबीर तसेच तात्कालीन ग्रामविकास अधिकारी कैलास भगत व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांनी उत्कृष्ट उपक्रम नियोजनबद्ध कार्यक्रमावर सातत्य ठेवले व राज्यभरात या अभियानात जोरदार प्रदर्शन केले होते.
(ads)
या उल्लेखनीय कामगारी बद्दल राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री श्रीमती सुमित्राताई पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
(ads)
यावेळी ग्रामविकास अधिकारी दीपक कोळी, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी कैलास भगत, सरपंच ज्योती संजय भालेराव,चंद्रकांत भंगाळे, संजय भालेराव तसेच ग्रामपंचायत सदस्य हेमांगी चंद्रकांत भंगाळे, अकलाख खाटीक, जितेंद्र सोनजी नेमाडे, शाहिद शेख मोहम्मद मण्यार यांच्यासह आदी उपस्थित होते.




