https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

ऐनपूर महाविद्यालयात गुणवंतांचा गौरव; वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. विविध शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

(ads)

कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मा. श्री. श्रीराम नारायण पाटील, अध्यक्ष मा. श्री. भागवत विश्वनाथ पाटील, उपाध्यक्ष मा. श्री. रामदास नारायण महाजन तसेच सेक्रेटरी मा. श्री. संजय वामन पाटील आणि संस्थेचे सर्व मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

(ads)

प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करत वर्षभरातील शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक कामगिरीचा आणि महाविद्यालयातील सर्व विभागांचा आढावा सादर केला. त्यानंतर प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

(ads)

संस्थचे अध्यक्ष श्री. भागवत विश्वनाथ पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना उच्च ध्येय ठेवून सातत्याने प्रगती साधण्याचे आवाहन केले. या प्रसंगी उपाध्यक्ष श्री. रामदास नारायण महाजन यांनी आपल्या भाषणात कोणतेही क्षेत्र किंवा विषय हा एकापेक्षा दुसरा वरचढ नसतो; प्रत्येक क्षेत्राला समान महत्त्व असून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास निश्चित यश प्राप्त होते, असे ठामपणे नमूद केले.

(ads)

यावेळी विद्यापीठ परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या तसेच क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसरूपी धनादेश प्रदान करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या यशामागे पालक व प्राध्यपकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले आणि भविष्यातही महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार व्यक्त केला. या वर्षात महाविद्यालयातील प्राध्यापकांचा त्यांच्या शैक्षणिक पुरस्कार, उत्कृष्ट विद्यार्थी मार्गदर्शन तसेच विविध उपक्रमांतील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.

(ads)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील डॉ.जे.पी.नेहते व प्रा.एस.बी.महाजन यांनी केले, पारितोषिक वितरान समितीचे सदस्य प्रा.व्ही.एच.पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तर आभार प्रदर्शन डॉ. रेखा पी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!