https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

वित्तीय व डिजिटल साक्षरते बाबत कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



ऐनपूर:सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास हाविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये वित्तीय व डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वित्तीय साक्षरतेवर सायली अहिरराव यांनी तर सायबर सुरक्षेवर ललित सोनार यांनी मार्गदर्शन केले.

(ads)

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले.

वित्तीय साक्षरता या विषयावर बोलताना सायली अहिरराव यांनी बचत, गुंतवणूक, बँकिंग व्यवहार, डिजिटल पेमेंट प्रणाली तसेच फसवणुकीपासून बचाव करण्याचे मार्ग याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे महत्त्व पटवून देत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले.

(ads)

सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करताना ललित सोनार यांनी सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, मजबूत पासवर्डची गरज, फिशिंग व ऑनलाईन फसवणूक ओळखण्याचे तंत्र याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. इंटरनेटचा वापर करताना सतर्कता आणि जबाबदारी या दोन गोष्टी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(ads)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जे. पी. नेहेते यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रेखा पी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!