रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये असलेल्या बौद्ध समाजातिल विविध समस्या संदर्भात चर्चा करून त्याचे निराकरण करण्यासाठी दि . १६ फेब्रुवारी २०२६ रोजि रावेर तहसिलदार कार्यालयामध्ये तहसिलदार . गटविकास अधिकारी तसेच संबधित अधिकारी यांच्या उपस्थितित बैठकि मध्ये बौद्ध समाजातील विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले परंतु १० दिवसात सुद्धा दिलेल्या अश्वासनाची पुर्तता न केल्यामुळे .
(ads)
रावेर येथे दि . २६ फेब्रुवारी २०२६ रोजी तहसिलदार कार्यालया समोर निळे निशाण सामाजिक संटनेच्या वतिने रावेर तालुक्यातील बौद्ध समाजाच्या असलेल्या समस्याचे निराकरण करण्यात यावे .या उद्देशाने निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले . आंदोलना दरम्यान घोषणाबाजी करून बौद्ध समाजाच्या व्यक्तींचा जाणिव पुर्वक मानसिक छळ करणाऱ्या विरुद्ध कारवाई करा . कर्जोद गांवात शासनाने बौद्ध समाजाला दिलेल्या गट क्र १५२ हा भुखंड दफनभूमि करिता आरक्षीत असतांना त्या भुखंडा वरिल अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे . अहिरवाडी - रमजिपुर येथे गेल्या ५० वर्षा पासुन बौद्ध समाजाचे अतिक्रमित घरे त्यांच्या नांवावर करण्यात यावी .
(ads)
पुनखेडा येथिल बौद्ध समाज वस्तीच्या मुख्य मार्गावर जाणिवपूर्वक समजदेवून सुद्धा वारंवार शेनखत टाकुन बौद्ध वस्तीकडे येणारा मार्ग बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी . अन्यथा यापुढे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनि दिला आहे . या प्रसंगी संघटनेचे तालुका अध्यक्ष विठ्ठल गाढे , आरोग्य समिती ता . अध्यक्ष सदाशिव निकम , युवक ता . अध्यक्ष विक्की जाधव , युवक नियोजन समिती अध्यक्ष विशाल तायडे , नारायण सवर्णे , अंकुश इंगळे , महेंद्र कावडकर , आकाश निकम , उदय वाघ , दादाराव निकम , गोकुळ रायमळे , दिनेश ससाणे , कुंथलेश इंगळे , मनिषा वानखेडे , सुशिला बाविस्कर तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .




