ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तहसील कार्यालय रावेर यांच्या मार्फत आयोजित निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, घोष वाक्य स्पर्धेत भाग घेतला व त्यात यश प्राप्त केले यात पोस्टर स्पर्धेत कु गायत्री सुनील कोळी हिने प्रथम, कु रुचिता विजय महाजन हिने द्वितीय तर कु समीक्षा जीवन पाटील हिने तृतीय क्रमांक मिळवला तसेच निबंध स्पर्धेत कु गायत्री सुपडू पाटील हिने प्रथम, वेदिका अनिल पाटील हिने द्वितीय तर कु कोमल विनोद येवले हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर घोष वाक्य स्पर्धेत कु निकिता समाधान कोळी हिने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच मतदान जनजागृती या कामासाठी महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून गौरविण्यात आले.या स्पर्धेसाठी नोडल अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर यांनी मेहनत घेतली.तहसील कार्यालयामार्फत त्यांना उत्कृष्ट नोडल अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे. बी. अंजने यांचे मार्गदर्शन लाभले.



