रावेर येथे रमजान ईद उत्साहाने साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  

रावेर येथे रमजान ईद उत्साहाने साजरी

रावेर (जमील शेख) इस्लाम धर्मातील पवित्र सणापैकी एक गोड ईद म्हणजेच ईद-उल-फित्र शनिवार रोजी शहर व रावेर तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली .सर्वांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या.

(ads)

मुस्लिम अनुयायांनी आज रावेर येथे उटखेडा रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी 8 -30 वाजता येथे पोहोचून विशेष ईदची नमाज अदा केली. रावेर येथील जामा मशिदीचे इमाम मौलाना शोएब रझा यांनी ईदची नमाज पठण केली तालुक्यातील गावात ईदगाह आणी मशिदी मध्ये जमवून मुसलीम बांधवांनी ईद -उल-फित्र नमाज अदा केली आणी त्यांचे कुटूंब नातेवाईक आणी देशवासीयाकरिता सुख शांती आणी आनंदासाठी अल्लाह कडे प्रार्थना केली.

 (ads)

यावेळी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा करून एकमेकांनी मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी ईदची शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर अप्पर जिल्हाधिकारी रावेर प्रशिक्षणार्थी तहसीलदार दिपा जेधे , पोलिस निरिक्षक डॉ विशाल जयस्वाल , माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद ' उपनगराध्यक्ष आसीफ मोहमंद , माजी नगराध्यक्ष पदमाकर महाजन, माजी नगराध्यक्ष हरिष शेठ गनवाणी , संतोष महाजन , समाजिक कार्यकर्ते मुन्ना अग्रवाल ,धोमा तायडे ,, संतोष पाटील, शैलेंद्र अग्रवाल , शेख ग्यास , युसूफ खान , जमाते इसलामी चे शफी सर ,सरफराज खान सर , आदी उपस्थित होते. याप्रसंगी पोलिस निरिक्षक डॉ . विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!