विवरे येथे १० वर्षीय जमीरा फात्मा चे महिनाभराचे रोजे पूर्ण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


विवरा ता.रावेर प्रतिनिधी (जमील शेख)

येथील विवरे बुद्बक येथील आझाद नगर भागातील रहिवासी शेख वसीम शेख सलीम यांची १० वर्षीय मुलगी जमीरा फात्मा शेख वसीम यांनी उन्हाळ्यातही आपला मजबूत निर्धार दाखवत संपूर्ण पवित्र रमजान महिन्याचे ३० रोजे पूर्ण केले. याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

   (ads)

    संपुर्ण महिनाभराचे रोजे म्हणजे अतिशय कठोर उपवास मानला जातो. या कालावधीत सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत काहीही खाने-पिणे वर्ज्य असते. त्यामुळे या उपवासात भल्याभल्यांची कसोटी लागते. मात्र १० वर्षीय जमीरा फात्मा याने दररोज शाळेत जात असूनही एकही दिवस न चुकवता महिनाभराचे रोजे ठेवले. 

(ads)

एवढ्याश्या या वयात त्याच्या या चिकाटीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. प्रचंड उष्णतेचा कोणताही परिणाम त्यांच्या निर्धारावर झाला नाही. त्याने दाखवलेली श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वास खरोखर प्रेरणादायी असून समाजासाठी एक आदर्श उदाहरण ठरत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!