सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जे बी अंजने हे होते . त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेचे दैनंदिन जीवनातील महत्व अनेक उदाहरणाच्या साहाय्याने पटवून दिले.तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ महेंद्र सोनवणे हे होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याविषयी सखोल माहिती दिली. त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कार या विषयावर देखील प्रकाश टाकण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ सतिष वैष्णव, प्रा डॉ एस ए पाटील,प्रा डॉ पी आर महाजन, प्रा डॉ एस बी पाटील, प्रा. हेमंत बाविस्कर, प्रा डॉ गवळी,प्रा डॉ संदीप साळुंखे, प्रा डॉ रामटेके,प्रा. अक्षय महाजन, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. म्हसाने याच बरोबर अनेक विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद हजर होते.




