https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

भारतीय बौद्ध महासभा भुसावळ तालुक्याच्या वतीने महिला उपासिका शिबिराचे उद्घाटन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


भुसावळ:- भुसावळ शहरातील राहुल नगर येथे भारतीय बौद्ध महासभा भुसावळ तालुक्याच्या वतीने महिला उपासिका शिबिराचे अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष प्रतिभा सोनवणे तर उद्घाटन महिला जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे, प्रमुख उपस्थितीत राज्य संघटक लताताई तायडे,जिल्हा अध्यक्ष सुमंगल अहिरे, जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार,कार्यालयीन सरचिटणीस शैलेंद्र जाधव, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सरदार, लेफ्ट कर्नल रमेश साळवे, जिल्हा संघटक ए. टी. सुरडकर, चंद्रकांत वाघ, जिल्हा सचिव वनिता साळवे हे उपस्थित होते.

(ads)

सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजन करण्यात आले. नंतर बुद्ध वंदना घेण्यात आली.

त्यानंतर मान्यवरांची शिबिराला मंगलकामना दिल्या. व मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात राहुल नगर मधील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी महिला जिल्हा अध्यक्षा प्रियांका अहिरे व जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांनी केले.

शिबिराकरिता भुसावळ शहर अध्यक्ष प्रतिभा सोनवणे, शहर सरचिटणीस सुरेखा गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

(ads)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!